मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ज्या कार्यक्रमांना जातात तिथे त्यांच्यावर अनेकांच्याच नजरा खिळतात. त्यांचे स्टायलिश लूक, ते कॅरी करण्यासाठीचा आत्मविश्वास आणि त्याच बळावर होणारी अभिनेत्रींची बेधडक एंट्री, सगळं कसं साचेबद्ध आखणी केल्यासारखं वाटतं. (Bollywood Actress )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही अभिनेत्रींचं नुसतं समोरून चालत जाणंही चाहत्यांसाठी फार मोठी गोष्ट ठरते. यामध्ये अभिनेत्री मलायका अरोरा ही सर्वांच्याच आवडीची असं म्हणालयाल हरकत नाही. 


योगा आऊटफिट असो किंवा एखादा हाय स्लिट गाऊन, मलायकानं प्रत्येक वेळी तिच्या लूकला सुरेखपणे हाताळलं आहे. पण, नुकत्याच झालेल्या एका पार्टीमध्ये मलायकालाही मागं टाके अशी एंट्री एका अभिनेत्रीनं घेतली. 


नव्वदच्या दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री आहे, काजोल. धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ, अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीसाठी काजोल पोहोचली.


ती आली, कारमधून उतरली आणि तडक फोटोसाठी तयार केलेल्या पोडियमकडे गेली. काजोल ज्या पद्धतीनं पोडियमकडे चालत गेली ते पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Voompla (@voompla)


स्वभावाप्रमाणेच ती दिलखुलासपणे इथं आली आणि मलायकाची अनेकांच्या मनावर असणारी जादूही फिकी पडली. तुम्ही पाहिला का हा व्हायरल व्हिडीओ?