The Kashmir Files : कंगनाच्या `या` वक्तव्यानं पेटू शकतो वणवा; काश्मीर मुद्द्यावर पाहा काय म्हणालीये `क्वीन`
अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर वक्यव्य करत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत हिनं कायमच तिच्या भूमिका अगदी स्पष्टपणे मांडल्या आहेत. अनेकदा तर तिच्या वक्तव्यामुळं बऱ्याच चर्चा आणि वादांनाही तोंड फुटलं आहे. कंगनानं काही वक्तव्य केलं आणि त्याबद्दल चर्चा झाल्या नाहीत, असं फारच कमी. (Kangana Ranaut)
आतासुद्धा या अभिनेत्रीनं अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर वक्यव्य करत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
कधीही वापरले नाहीत, असे शब्द कंगनानं इथं वापरत तिच्या मनात असणारा संताप बाहेर काढला आहे. हे पाहून नेटकऱ्यांनाही ताडकन जाग आली आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित The Kashmir Files 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावर तिनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'द काश्मीर फाईल्स, या चित्रपटासंदर्भातील बॉलिवूडची शांतता निरिक्षण करण्याजोगी आहे. फक्त कथानकच नाही, तर चित्रपटाचा व्यवसायही फार बोलका आहे', असं चिनं लिहिलं.
सकाळी 6 वाजताचा शोसुद्धा हाऊसफुल्ल झाल्याचं सांगत हे सर्व अविश्वसनीय असल्याचं कंगना म्हणाली. पुढे तिनं जे म्हटलंय ते पाहता यावरुन वादंग माजण्याची शक्यता नाकारता येत नाही.
'Bullydawood आणि त्यांच्या मागेपुढे करणाऱ्यांना या साऱ्याचा सदमा बसला असावा', अशा शब्दांत काहींना बसलेला हादरा इथं तिनं जगासमोर आणला.
आता राहिला मुद्दा असा, की कंगनानं Bullydawood या शब्दात केलेला दावूदचा उल्लेख पाहता यावर कोणी काही प्रतिक्रिया देतं का....