मुंबई : राज्यसभेमध्ये भाजप खासदार रवी किशन यांच्या वक्तव्यावर नाव न घेता निशाणा साधणाऱ्या समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांना अभिनेत्री Kangana Ranaut कंगना राणौत हिनं काही बोचरे प्रश्न केले आहेत. ज्यामध्ये तिनं बच्चन यांना प्रश्न करतेवेळी वस्तुस्थितीचं गांभीर्य पटवून देण्यासाठी त्यांच्यापुढे त्यांच्या मुलांचीच म्हणजेच श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची उदाहरणं ठेवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझ्या जागी तुमची मुलगी असली, तिला मारहाण करण्यात आली असती, ड्रग्ज देण्यात आले असते आणि तिची तारुण्यावस्थेत असताना तिची छेडछाड करण्यात आली असती तरीही तुम्ही हेच म्हटलं असतं?, वारंवार थट्टा केली जात असल्याची तक्रार करणारा आणि सातत्यानं छळ होत असणारा अभिषेक एक दिवस फासावर दिसला असता तरीही तुम्ही हेच म्हटलं असतं का?', असं म्हणत तुमची कळकळ आमच्यासाठीसुद्धा दाखला असा टोला तिनं लगावला. 


मंगळवारी राज्यसभेच्या सत्रात जया बच्चन यांनी आपल्या वक्तव्यानं कंगनासोबतच अनेकांचं लक्ष वेधलं. 'कलाविश्नाशी संलग्न व्यक्तींना सोशल मीडियावर फटकारलं जात आहे. या वर्तुळात नावारुपास आलेली लोकंच कलाविश्वाला गटार म्हणत आहेत. मी याच्याशी मुळीच सहमत नाही. मी आशा करते की सरकारडून अशा व्यक्तींना या शब्दांचा वापर न करण्याबाबतची ताकीद देण्यात येईल', असं समाजवादी पक्षाच्या जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांचा संतप्त सूच सारंकाही सांगून गेला. 



 


दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी जोडल्या गेलेल्या ड्रग्जच्या या धक्कादायक वर्तुळात सध्या एनसीबीकडून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. ज्यामध्ये सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.