मुंबई : कलाविश्वातील काही प्रस्थापितांवर कायमच निशाणा साधणाऱ्या 'क्वीन' KANGANA RANAUT कंगना राणौत हिनं पुन्हा एकदा काही सेलिब्रिटींविरोधात आवाज उठवला आहे. यावेळी रणबीर कपूर, दीपिका पदुकोण हे कलाकार कंगनाच्या निशाण्यावर आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विट करत तिनं रणबीर आणि दीपिकाबाबत असं काही वक्तव्य केलं ज्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या. रणबीरचा उल्लेख 'सिरियल स्कर्ट चेजर' आणि दीपिकाला थेट 'सायको', असं म्हणत कंगनानं त्या दोघांनाही निशाण्यावर घेतलं आहे. एका ट्विटर युजरच्या ट्विटला उत्तर देत कंगनाने तिखट भाषा वापरत या दोन्ही आघाडीच्या सेलिब्रिटींना खडे बोल सुनावले. 


'रणबीर कपूर हा सिरियल स्कर्ट चेजर आहे, पण त्याला रेपिस्ट म्हणण्याची कोणाचीही हिंमत नाही. तर, दीपिका ही स्वयंघोषित मानसोपचाराची रुग्ण आहे. पण तिला कोणीही सायको म्हणत किंवा चेटकीण म्हणत नाही. ही नावं फक्त कलाविश्वात बाहेरुन येणाऱ्या अद्वितीय व्यक्तींसाठी राखीव आहेत जे लहान शहरांतून आणि सर्वसामान्य कुटुंबांतून आले आहेत. 




कंगनाचे हे ट्विच पाहता सोशल मीडियावर पुन्हा एका नव्या वादानं डोकं वर काढलं आहे. दरम्यान, कंगनानं कायमच कलाविश्वातील गटबाजी, घराणेशाहीविरोधात आवाज उठवला आहे. तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांसारख्या अभिनेत्रींना बी- ग्रेड अभिनेत्री म्हणत त्याच्याविरोधात आवाज उठवला होता. तर, महेश भट्ट, करण जोहर, जावेद अख्तर, आदित्य चोप्रा यांसारख्या मोठ्या दिग्दर्शक आणि कलाविश्वातील सेलिब्रिटींबाबतही तिनं नाराजीचा सूर आळवला होता.