मुंबई : कलाविश्वात फेमिनिझम अर्थात स्त्रीवादाच्या मुद्द्यावर अनेकदा वाद, प्रश्नोत्तरं, आरोप- प्रत्यारोपांची सत्र रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. याच कलाविश्वात आता या स्त्रीवादाची खरी सुरुवात मात्र आपण केली असा कणखऱ आणि ठाम सूर आळवला आहे अभिनेत्री kangana ranaut कंगना राणौत हिनं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतून काढता पाय घेतल्यानतर कंगना मनालीमध्ये तिच्या घरी पोहोचली. सध्या ती तिथं दहा दिवसांसाठी क्वारंटाईन असेल. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र तिनं आपली ठाम भूमिका सातत्यानं मांडत आपल्यावर निशाणा साधणाऱ्यांचा समाचार घेण्याचं सत्र सुरुच ठेवलं आहे. 


ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि खासदार जया बच्चन यांनी नुकतंच राज्यसभेच्या एका सत्रात कलाविश्वाचा उल्लेख गटार म्हणून करणाऱ्यांना टोला लगावला. ज्या थाळीत खाता त्याच्याशीच बेईमानी करता, असा उल्लेख करत त्यांनी कंगना आणि तिच्या पक्षात बोलणाऱ्यांवर टीका केली. यालाच उत्तर देत कंगनानं एक ट्विट केलं. ज्यामध्ये तिनं थेट कास्टींग काऊचबाबता गौप्यस्फोटही केल्याचं पाहायला मिळालं. 


'जया जी आणि त्यांच्या या कलाविश्वानं कोणली थाळी (संधी) दिली ? एक थाळी मिळाली होती, ज्यामध्ये दोन मिनिटांच्या भूमिकेसाठी आयटम नम्बर आणि एक रोमँटीक सीन मिळत होता. तेसुद्धा हिरोसह शैय्यासोबत केल्यानंतर. मी या कलाविश्वाला स्त्रीवाद शिकवला. ही (कलाविश्वाची) थाळी देशभक्ती आणि स्त्रीप्रधान चित्रपटांनी सजवली. ही माझी स्वत:ची थाळी आहे जया जी तुमची नाही', असं ट्विट कंगनानं केलं. 



स्वगृही परतल्यानंतर कंगनानं थेट शब्दांमध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमधील प्रस्थापितांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. कलाविश्वातील हा शो बिझनेस विषारी असल्याचं म्हणत या आभासीपणाच्या जाणिवेसाठी किमान अध्यात्मिकदृष्ट्या भक्कम असणं गरजेचं असल्याची बाब तिनं अधोरेखित केली होती.