Bramhastra चित्रपटावर बरसली कंगना राणावत; म्हणाली, ``600 कोटी मातीत...``
अयान मुखर्जीचा `ब्रह्मास्त्र` चित्रपट 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Kangana Ranaut on Bramhastra: कंगना राणावत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' (Brahmastra) या चित्रपटावरून वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे सोबतच तिनं या चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनाही लक्ष केले आहे. कंगना राणावत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. (bollywood actress kangana ranuat says brahmastra movie director has wasted 600 crore shares instagram story)
चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे काही तास झाले आहेत की नाही तोच कंगना राणावत आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी यांना लक्ष्य करताना दिसली. ज्यात तिनं म्हटले आहे ब्रम्हास्त्र या चित्रपटासाठी दिग्दर्शक अयान मुखर्जींनी 600 करोड रूपये वाया घालवले.
काय म्हणाली कंगना?
कंगना राणावत शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते की अयान मुखर्जीने फोटोग्राफीसाठी 14 दिग्दर्शक बदलले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी 400 दिवस लावले. 85 सहाय्यक संचालकही बदलले. 600 कोटींचा सेट तयार केला त्यातून या चित्रपटाचे आयत्या वेळी नावंही बदलले.
अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. यंदाच्या बॉक्स ऑफिसवर हा टॉप ओपनिंग चित्रपट ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असला तरी पहिल्याच दिवशी त्याचे कलेक्शन 36 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जगभरात 75 कोटींची कमाई केली आहे.
अयान मुखर्जीने 'वेकअप सिड' (Wake Up Sid) आणि 'ये जवानी है दिवानी' (Yeh Jawanni Hai Deewani) या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर गाजले होते. या दोन्ही चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता.