Mowgli : Legend of the Jungle- ...जंगल बदल रहा है; नव्या रुपात `मोगली` प्रेक्षकांच्या
बालपणीच्या आठवणी सांगा असं कोणी म्हटलं तर, या आठवणींमध्ये एका गोष्टीचा उल्लेख होतोच. ती गोष्ट म्हणजे `जंगल बुक`. बालपणीच्या याच आठवणींचा आधार घेत पुन्हा एकदा `मोगली`, `का`, `बघिरा`, `भालू` यांच्यासह `जंगल बुक`चा नवा अध्याय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. `मोगली लेजेंड ऑफ द जंगल`, असं त्या सीरिजचं नाव आहे.
मुंबई : बालपणीच्या आठवणी सांगा असं कोणी म्हटलं तर, या आठवणींमध्ये एका गोष्टीचा उल्लेख होतोच. ती गोष्ट म्हणजे 'जंगल बुक'. बालपणीच्या याच आठवणींचा आधार घेत पुन्हा एकदा 'मोगली', 'का', 'बघिरा', 'भालू' यांच्यासह 'जंगल बुक'चा नवा अध्याय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मोगली लेजेंड ऑफ द जंगल', असं त्या सीरिजचं नाव आहे.
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यामध्ये बॉलिवूड कलाकारांच्या आवाजातून आपल्या भेटीला 'का', 'बघिरा', 'निशा', 'शेरखान' अशी पात्र येतात.
माणसाच्या अतिक्रमणामुळे जंगलांचा होणारा ऱ्हास आणि त्यामुळे वन्यजीवांवर होणारे त्याचे परिणाम, त्यांच्या मनात खदखदणा राग आणि कधीही उद्रेक होईल अशी एकंदर परिस्थिती या साऱ्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
अभिषेक बच्चनच्या आवाजातील बघिरा, माधुरी दीक्षितच्या आवाजातील निशा, अनिल कपूरच्या आवाजातील भालू अशा सर्व पात्रांची झलक पाहता. हा नवा मोगली प्रेक्षकांच्या मनावर किती अधिराज्य गाजवतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या नेटफ्लिक्सचा हा नवा आणि तितकाच हवाहवासा वाटणारा नजराणा, म्हणजेच 'मोगली...' ही सीरिज ७ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.