Viral Video : 'एक नवी सुरुवात...', असं म्हणत कोणीही सोशल मीडिया पोस्ट केली, की लगेचच नेमकी कोणती सुरुवात? असा प्रश्न विचारत त्या पोस्टली उकल करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावतात. एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीनंही हल्लीच अशी पोस्ट केली आणि तिच्या या पोस्टनं सर्वांच्या नजरा वळवल्या. किंबहुना मागच्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री तिच्या निर्णयांनी सर्वांच्याच भुवया उंचावत आहे. आता म्हणे ती मुंबईपासून (Mumbai) दूर कुठेतरी शांततेच्या शोधात एक नवं घर उभारणार आहे.


'मला इथे मुंबईत किंवा कोणत्याही शहरात राहायचं नाहीये'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील आयुष्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेणारी ही अभिनेत्री आहे, (Kirti Kulhari) किर्ती कुल्हारी. काही दिवसांपूर्वीच टक्कल करत 'हे मी माझ्यासाठी केलंय', असं म्हणणाऱ्या किर्ती कुल्हारीनं तिच्या आयुष्यातील आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शहरी जीवनापासून दूर कुठेतरी आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा. 


नव्या घराच्या भूखंडावर भूमिपुजनाचा एक व्हिडीओ शेअर करत किर्तीनं लिहिलं, 'कांतारा, (Kantara) हे माझ्या नव्या घराचं नाव असेल जे मी येत्या 2 वर्षांमध्ये उभारण्याचं स्वप्न पाहतेय. हो, कांतारा या चित्रपटानंतरच मला हे नाव सुचलं. त्यामागची संकल्पना आणि परस्परावलंबी, निसर्गाप्रतीचा आदराचा अर्थ मला भावला. मला त्यापासूनच प्रेरणा मिळाली.'


हेसुद्धा वाचा : IPL 2023 मध्ये शतकी खेळीनंतरही विराटला अश्रू अनावर; तो क्षण सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणून गेला 


आपल्या एका कन्नड भाषिक मित्रानं या नावाचा अर्थ समजावून सांगितल्याची बाब स्पष्ट करत मला मुंबई किंवा इतर कोणत्याही शहरात राहायचं नाहीये, मला निसर्गाच्या कुशीत राहायचंय अशी इच्छा किर्तीनं तिच्या पोस्टमधून व्यक्त केली. आपल्या आयुष्यातील या वळणाप्रतीही तिनं आभाराची भावना व्यक्त केली आणि हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबतही शेअर केला. किर्तीनं शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून आणि तिनं लिहिलेलं कॅप्शन वाटून अनेकांनीच या नव्या प्रवासासाठी तिला शुभेच्छा दिल्या. 'ती कलाजगतापासून दूर जातेय का?' असेही प्रश्न अनेकांनीच विचारले. काहींना तिच्या या निर्णयानं धक्काही बसला. तर, काहींनी असे धाडसी निर्णय घ्यायला हवेत, असं म्हणत तिला दुजोरा दिला.



किर्तीनं तिच्या चित्रपट कारकिर्दीबाबत फारसा खुलासा केलेला नाही. पण, गेल्या काही दिवसांपासूनच्या तिच्या पोस्ट, पोस्टला लिहिलले कॅप्शन पाहता ती सध्या एका नव्या प्रवासाच्या दिशेनं जात असल्याचीच बाब स्पष्ट होत आहे.