गरोदरपणात मलायकाची विशेष काळजी; `या` खास व्यक्तीला दिला सल्ला
गरोदरपणात एखाद्या महिलेला स्वत:ची खुप काळजी घ्यायची असते.
मुंबई : वयाचा आकडा वाढत असला तरीही मादक सौंदर्याच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींना पिछाडीवर टाकणाऱ्या मलायका अरोरा हिनं आता म्हणे मुलीला दत्तक घेण्याचीही तयारी दाखवली होती. एकिकडे मलायच्या खासगी जीवनातील ही महत्त्वाची बाब समोर आलेली असतानाच दुसरीकरे गरोदरपणातील विशेष काळजी ती नेमकी कशी घेते याचाही उलगडा झाला आहे.
गरोदरपणात एखाद्या महिलेला स्वत:ची खुप काळजी घ्यायची असते. त्याच विचाराची मलायकाही आहे. तिच्या वागण्यातूनच हे स्पष्ट होतं. अहं.... इथं मलायकाच्या गरोदरपणाची नव्हे, तर तिच्या खास मैत्रीणीच्या गरोदरपणाची आणि मलायकानं तिची काळजी घेतल्याबाबतची चर्चा होतेय.
मलायका आणि अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) या खास मैत्रीणी आहेत. करीनानं नुकत्याच लिहिलेल्या 'प्रेग्नेंसी बायबल' (Pregnancy Bible) या पुस्तकासाठी मलायकानं विशेष स्तंभ (कॉलम)ही लिहिला आहे. एका रुबाबदार महिलेप्रमाणं बसण्याचा सल्ला मलायका करीनाला तिच्या गरोदरपणाच्या काळात वारंवार द्यायची आणि करीना त्यावर चांगलेच डोळे फिरवायची, असं या कॉलममध्ये लिहिलं आहे.
करीना गरोदरपणाचा काळ अतिशय मनमुरादपणे जगली आहे, असं मलायकानं या कॉलममध्ये लिहिलं आहे. ती जेवण बनवत होती, जी इच्छा असेल ती पूर्ण करत होती, अनेक तास आराम करत होती, असं मलायकानं या पुस्तकात लिहिलं आहे. मलायकासाठीही हा फॉल्स प्रेगनेंन्सीचाच काळ होता.
मलायका करीनाला सातत्यानं काही सल्ले देत होती. यापैकीचाच एक सल्ला म्हणजे, पायावर पाय ठेवून करुन किंवा दोन्ही पायांमधील अंतर बंद करून बसण्याचा सल्ला देत होती. मलायकाचा हा सल्ला ऐकून त्यावर प्रतिक्रिया देत मी पायांमधील अंतर कमी नाही करु शकत असंच करीना तिला सांगत होती.
मलायका अरोरा पुन्हा होणार आई, नव्या पाहुण्याची चाहुल?
करीनाच्या मॅटर्निटी फॅशनची प्रशंसा
मलायकानं करीनाच्या गरोदरपणातील फॅशन सेन्सची अमाप प्रशंसा केली. तैमुरच्या वेळी जशा प्रकारे तिनं फॅशन फॉलो केली, त्याचवेळीही जे च्या वेळीही तिनं खुप सुंदर काफ्तान घातले होते, असं मलायकानं पुस्तकाल लिहिलंय. जे च्या जन्मानंतर शेकोटी करुन सारे काफ्तान जाळून टाकण्याचा अजब सल्ला मलायकानं करीनाला दिला होता. हे पाहता बी- टाऊनमधील या सेलिब्रिटी मैत्रीणांचं हे नातं आणि अजब सल्ल्यांची देवाणघेवाण सुपरहिट ठरत आहे.