Malaika on Arjun: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा (Malaika Arora) मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर (Social Media) मलायका नेहमीच चर्चेत असते. मग तो तिचा लूक असो, फिटनेस किंवा मग खासगी आयुष्य. मलायका अरोराने अरबाज खानसोबत (Arbaaz Khan) घटस्फोट (Divorce) घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. नंतर जेव्हा मलायका आणि अर्जून कपूरमध्ये (Arjun Kapoor) प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं होतं तेव्हा तर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित या दोन घडामोडींवर मलायकाने जाहीरपणे भाष्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलाका नुकतीच 'इंडिया टुडे'च्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिला समाजात महिलांच्या निवडीवर नेहमीच शंका घेत प्रश्न उपस्थित केले जातात असं विचारण्यात आलं. कोणत्या व्यक्तीसोबत राहिलं पाहिजे, कोणाला डेट केलं पाहिजे यासंबंधी नेहमी महिलांना सल्ले दिले जातात. तुलाही रोज अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. मग तू त्याला कशी सामोरी जातेस असं विचारण्यात आलं. 


या प्रश्नावर उत्तर देताना मलायकाने सांगितलं की "जेव्हा मी घटस्फोट घेतला होता तेव्हा मला अनेकांनी तू घटस्फोट कशाला घेतेस, आयुष्यभर तुझ्यावर हा टॅग राहील असं सांगण्यात आलं होतं. नंतर जेव्हा मला माझं प्रेम सापडलं तेव्हा हिला कसं काय प्रेम मिळालं अशी शंका अनेकांनी उपस्थित केली. वयापेक्षा तरुण व्यक्तीशी प्रेम झाल्याने अनेकांनी माझ्यावर टीका केली. पण मी इतकंच सांगेन की प्रेमाचं काही वय नसतं. तुम्ही फक्त प्रेमात असता".


पुढे तिने सांगितलं की "तुम्ही तुमच्या वयापेक्षा छोट्या व्यक्तीशी प्रेम करता की मोठ्या याच्याने काही फरक पडत नाही. यावरुन आपल्यावर कोणी भाष्य करु शकत नाही. मला समजू शकतो असा जोडीदार लाभला हे मी माझं भाग्य समजते.  तो वयाने कमी असला तरी ठीक आहे. तो माझ्यापेक्षा तरुण आहे त्यामुळे मलाही तरुण वाटतं असं मी सांगेन. मला यामधून फार आनंद मिळतो. जगातील सर्वोत्कृष्ट असल्याचा भास होते. येथील महिलाही माझ्य़ाशी सहमत असतील. मी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही".


दरम्यान खान आडनावामुळे प्रसिद्धी मिळाली असं वाटतं का? विचारण्यात आलं असता मलायका म्हणाली "हो, मला खान आडनावाचा फायदा झाला. पण अखेर तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मेहनत करावी लागते. अनेकांनी मला खान आडनाव हटवू नको असं सांगितलं होतं. मी माझ्या सासू-सासऱ्यांचा आदर करते. पण मला माझ्या पायांवर उभं राहायचं आहे. मी आता स्वत:वर काम करत आहे".