मुंबई : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा हिने घरातून बाहेर पडावे आणि पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद करू नये, असं होणं कठीण आहे. पुन्हा एकदा पापाराझींनी गुपचूप मलायकाचा एक व्हिडिओ शूट केला आहे आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिटनेस फ्रिक मलायका योगासाठी घराबाहेर पडली होती. यादरम्यान ती काही फावला वेळ असताना कुत्र्यासोबत मस्ती करताना दिसला.


मलायका कुत्र्यासोबत खेळताना दिसली


मलायकासोबत खेळण्यासाठी कुत्रा बेचैन होत आहे. मलायकाही त्याला प्रेमाने कुरवाळताना दिसली. मलायकाला पाहताच शेजारी उभ्या असलेला बॉडीगार्ड आधी मदतीला धावून येत होता, पण दोघांचा खेळ बघून त्यांना हसू आवरता आले नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


पांढरा क्रॉप टॉप आणि शॉर्ट्समध्ये बसलेली मलायका बहुधा घाईत असावी. त्यामुळे ती थोड्या वेळाने बाहेर आली आणि सरळ जाऊन गाडीत बसली. हे छोटे व्हिडिओ मलायकाच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहेत. व्हिडिओमध्ये मलायकाच्या लूकचीही चर्चा होत आहे. 


डान्स शोची परिक्षक 


वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर मलायका आजकाल 'इंडियाज बेस्ट डान्सर 2' या डान्स शोला जज करत आहे. अलीकडेच तिने स्पर्धक गौरवसोबत 'बाबू जी जरा धीरे चलो' आणि 'छैय्या छैय्या' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. ज्यासाठी त्याचे खूप कौतुकही झाले होते.