मुंबई : देशाच्या किंबहुना जगाच्या कानाकोपऱ्यात असे काही कलाकार दडले आहेत. अशाच कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देणारे काही रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अशाच काही कार्यक्रमांपैकी एक म्हणजे, 'इंडियाज गॉट टॅलेंट'. 
प्रेक्षकांची पसंती मिळालेल्या या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयीची माहिती देत एक व्हिडिओही पोस्ट केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या या व्हिडिओने अनेकांचच लक्ष वेधलं असून,  यामध्ये मलायका चक्क जोरात किंचाळताना दिसत आहे. 


ती नेमकी का किंचाळतेय असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? 


खुद्द मलायकानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअरे केला असून त्यातच या प्रश्नाचं उत्तर मिळत आहे. 


स्पर्धक म्हणून आलेल्या एका जादूगाराची जादू चक्क मलायकावरच चालली असून, त्याच्या हातचलाखीमुळे ती थक्कच झाली. आता असं नेमकं झालं तरी काय, हे या व्हिडिओमध्ये पाहाच.