Malaika Arora स्लिम दिसावं म्हणून जे केलं, ते पाहून लोकं म्हणतात `हाडांची काडं...`
तिचा फिटनेस हा भल्याभल्यांना लाजवणारा.
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच तिच्या फिटनेसनं सर्वांनाच थक्क करते. वयाच्या पन्नाशीच्या दिशेनं मलायकाची वाटचाल सुरु झालेली असतानाही तिचा फिटनेस हा भल्याभल्यांना लाजवणारा. (Malaika Arora)
म्हणजे अर्जुन कपूरची मलायकाला पाहून जी अवस्था होते, चाहत्यांचीही काहीशी अशीच अवस्था असेल यात शंका नाही.
घायाळ करणाऱ्या अदा आणि मादक सौंदर्यासाठी ओळखली जाणारी हीच मलायका यावेळी मात्र काहीतरी असं करुन गेली जे पाहून तिची जोरदार खिल्ली उडवली गेली.
निमित्त ठरतंय ते म्हणजे तिचे व्हायरल होणारे फोटो.
योगा क्लासच्या बाहेर मलायका असतानाच तिची काही छायाचित्र माध्यमांनी टीपली. पाहता पाहता तिचे फोटो भयंकर व्हायरल झाले.
यावेळी मलायका नेहमीसारखीच सुपरफिट दिसत होती. पण, मुळातच स्लिम असणाऱ्या या सौंदर्यवतीनं आणखी स्लिम दिसण्यासाठी म्हणून पोट आत घेतलं.
बस्स, मग काय? तिच्या बरगडीची हाडंच दिसू लागली. तिची ही विचित्र पोझ पाहिल्यानंतर ट्रोलर्सना आयतं कोलित मिळालं आणि त्यांनी मलायकाची जोरदार खिल्ली उडवली.
'हाडांची काडं...' , 'किती ही हडकुळीट अशा शब्दांत तिची खिल्ली उडवली गेली.
अर्थात मलायका त्यावर व्यक्त झालेली नाही. पण, तिच्या या फोटोंची चर्चा मात्र बरीच झाली.