चिरागसह तुझे फोटो इतके व्हायरल का होत आहेत? कंगनाने केला खुलासा, म्हणाली `त्याने एक-दोनदा मला....`
Kangana Ranaut Chirag Paswan Viral Photo: बॉलिवूड अभिनेत्री-खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी एका चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यानंतर आता संसदेत दोघे सहकारी म्हणून काम करत आहेत.
Kangana Ranaut Chirag Paswan Viral Photo: बॉलिवूड अभिनेत्री-खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि चिराग पासवान (Chirag Paswan) दोघेही संसदेत खासदार म्हणून एकत्र काम करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, चिराग पासवानने एका बॉलिवूड चित्रपटात काम केलं असून यामध्ये कंगना रणौत अभिनेत्री होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. यानंतर चिराग पासवाननेही सक्रीय राजकारणासाठी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता. दरम्यान कंगना आणि चिराग पासवान यांचे संसदेतील भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यावर कंगनाने आता भाष्य केलं आहे.
कंगनाने 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत चिराग पासवानसह तिचे फोटो इतके व्हायरल का होतात यावर भाष्य केलं आहे. हा प्रश्न विचारण्यात आला असता कंगना रणौत जोरजोरात हसू लागली आणि हात जोडले. अरे यार संसदेला तर सोडून द्या असं सांगत ती हसू लागली आणि म्हणाली ते लोकशाहीचं मंदिर आहे.
"यार, संसदेला तर सोडून द्या. ते संविधानाचं मंदिर असून किमान त्याला तरी सोडा. मी तिथे संपूर्ण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते. चिरागला मी पहिल्यापासून ओळखते. तो माझा फार चांगला मित्र आहे. बिचाऱ्याने मला एक-दोनदा फार हसवलं आहे. पण तुम्ही लोक तर मागेच लागला आहेत. आता तर तोरस्ता बदलून निघून जातो. हे योग्य नाही", असं कंगनाने सांगितलं.
मी पुन्हा चित्रपटसृष्टीत येणार नाही - चिराग पासवान
चिराग पासवान यांनी एका मुलाखतीत आपण पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. "मी बॉलिवूड सोडलं नाही. बॉलिवूडने मला सोडलं. मला वाटतं की मी बॉलिवूडसाठी बनलेलो नाही. लोक तुम्हाला चांगले दिसता, चांगले बोलता, चित्रपटसृष्टीत नक्कीच प्रयत्न करा असे म्हणत, झाडावर चढवत असतात. माझा चित्रपट क्षेत्राकडे कधीच कल नव्हता. आजूबाजूच्या लोकांनी अभिनयात यायला भाग पाडले," असं चिराग पासवान यांनी सांगितलं होतं. चिराग पासवाने रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. रामविलास पासवान हे बिहारचे मोठे नेते होते. ते अनेकवेळा केंद्रीय मंत्रीही होते. 2020 मध्ये त्यांचं निधन झालं.