मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी नुकतीच १८ व्या आयफा अॅवॉर्डसमध्ये दिसली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मरुन रंगाच्या गाऊनमध्ये ग्रीन कार्पेटवर उतरलेल्या नर्गिसनं साहजिकच मीडियाचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं. डीप नेक ड्रेसमध्ये ग्रीन कार्पेटवर उतरलेल्या नर्गिसची अनेकांनी तोंडभरून स्तुती केली.



याच कार्यक्रमातील काही फोटो नर्गिसनं इन्स्टाग्रामवर शेअर केले. परंतु, तिचा बोल्ड लूक सोशल मीडियाच्या वारकऱ्यांना काही फारसा रुचलेला दिसत नाही. 



युझर्सनं तिला या ड्रेसवरून आणि तिच्या लूकवरून चांगलंच ट्रोल केलं. काहींना तर नर्गिसनं वजन वाढवल्याचंही दिसतंय. 


बहुतेकदा अभिनेत्री आपलं वाढलेलं वजन लपवताना दिसतात... परंतु, नर्गिसनं मात्र बेफिकीरपणे हे सोशल मीडियावर सांगून टाकलं.