मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. आता पून्हा एकदा तिने सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट केले आहेत. हे पोस्ट पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तसेच या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  


 


नोरा फतेही ग्रीन कलरच्या आउटफिटमध्ये स्पॉट झाली होती. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नोराने हिरव्या रंगाचा स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातला आहे. ज्यामध्ये पांढऱ्या रंगाची बॉर्डर आहे. तसेच नोराने पांढरे हिल्स आणि लांब कानातलेही घातले होते.  



नोराचे हे फोटो व्हायरल होत असून चाहते खूप कमेंट करत आहेत. 



नोरा सध्या डान्स दिवाने ज्युनियर हा रिअॅलिटी शो जज करते आहे. शोमध्ये तिच्यासोबत नीतू कपूर आणि कोरिओग्राफर मर्झी दिसत आहेत.



 नोरा फतेही लवकरच पवन कल्याणसोबत 'हरी हर वीरा मल्लू' या चित्रपटात दिसणार आहे.