Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा 24 सप्टेंबरला राजस्थानमध्ये अतिशय थाटामाटात पार पडला. खास पाहुण्याच्या उपस्थितीत परिणीची आणि राघव यांनी यावेळी लग्नगाठ बांधली आणि पाहता पाहता नवदाम्पत्याची पहिली झलक टीपण्यासाठी अनेकांचीच घाई झाली. पण, इथं एक नियम मात्र आड आला. लग्नसोहळ्यामध्ये मोबाईल फोनच्या कॅमेरांसाठी काही नियम आखण्यात आले असल्यामुळं सेलिब्रिटी जोडप्याचे सर्व विधी होतानाचे फोटो कोणालाच टीपता आले नाहीत. पण, इतके सारे नियम असतानाही परिणीची आणि राघव यांचा लग्नानंतरच पहिला फोटो समोर आलाच. जिथं मिस्टर आणि मिसेस चड्ढांना पाहून सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हातावर रंगलेली मेहंदी, कपाळी कुंकू आणि चेहऱ्यावर असणारा आनंद परिणीतीचं सौंदर्य आणखी खुलवून जात होता. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये राघव चड्ढा हेसुद्धा सुटाबुटात रुबाबदार दिसत होते. हा फोटो लग्नानंतरच्या पार्टीतील असल्याचं म्हटलं जात आहे. जिथं परिणीतीनं वेस्टर्न टच असणारी साडी नेसल्याचं पाहायला मिळालं. Baby Pink रंगाची छटा असणारी ही साडी, गळ्यासरशी असणारा मोठा नेकलेस तिच्या सौंदर्यात भर टाकत होता. तर, परिणीतीच्या हातात असणारा चुडा भलताच भाव खाऊन गेला. 


सहसा उत्तर भारतीय आणि त्याहूनही पंजाबी लग्नांमध्ये चुड्याला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. जिथं अनेक नववधू पारंपरिक अशा लाल रंगाच्या चुड्याला प्राधान्य देतात. किंबहुना खुद्द परिणीतीच्या बहिणीनं म्हणजेच प्रियांका चोप्रानंही असंच केलं होतं. पण, परिणीतीनं मात्र थोडं ऑफबिट जात लालऐवजी गुलाबी रंगाच्या चुड्याला पसंती दिली. हा चुडा तिच्या पेहरावालाही शोभून दिसत होता. थोडक्यात परिणीतीचा हा साधा तरीही उठावदार लूक आता तरुणींच्या मनात घर करून गेला आहे. 


हेसुद्धा वाचा : Chandramukhi 2 Hindi Trailer Out : 'चंद्रमुखी 2' चा हिंदी ट्रेलर रिलीज, पाहा कंगना राणौतची झलक


 



उदयपूर येथील द लीला पॅलेस येथे परिणीती आणि राघवची लग्नगाठ बांधली गेली. या जोडीचे सप्तपदी आणि लग्नातील इतर विधींचे फोटो समोर आलेले नाहीत. पण, परिणीतीचा चुडा पाहता फिकट गुलाबी रंगाशीच तिचा लेहंगाही मिळताजुळता असावा असं म्हणायला हरकत नाही. राजस्थानच्या सुरेख वातावरणामध्ये परिणीती आणि राघव यांनी जीवनातील एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. जावेळी संपूर्ण उदयपूरमध्ये त्यांच्याच लग्नाची धूम पाहायला मिळत होती. बँड, बाजा, बारात अशा थाटात सोहळा पार पडला.