मुंबई : रोजच्या धकाधकीच्या दिवसांमध्ये कधीकधी काही निवांत क्षणांची गरज लागतेच. प्रत्येक गोष्ट, वेळेची मर्यादा पाळत जगत असताना आपण अनेकदा स्वत:साठी जगणं सोडतो. अशातच मग या दैनंदिन जीवनापासून काही काळ उसंत घेत कुठंतरी दूर जाण्याची इच्छा व्यक्त केली जाते. एका बॉलिवूड अभिनेत्रीनंही अशीच इच्छा व्यक्त केली आणि तिची ही इच्छा पूर्णही झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या चेहऱ्यावर असणारं हास्य आणि आपल्या जीवनातील सर्वात मोठी गुपित गोष्ट सर्वांसमोर उघड करणारी ही अभिनेत्री आहे परिणीती चोप्रा. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करणाऱ्य़ा या अभिनेत्रीनं सर्वांनाच ट्रॅवल गोल्स दिले आहेत. 


मागच्या काही काळापासून विविध ठिकाणांना भेट देणारी ही अभिनेत्री सध्या नेपाळमध्ये आहे.  तिथून प्रत्येक अपडेट ती चाहत्यांना सातत्यानं देताना दिसत आहे. यातच नुकत्याच शेअर झालेल्या तिच्या फोटोनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 



शांततेच्या शोधात थेट नेपाळ गाठलेल्या या अभिनेत्रीला या शांत मुद्रेत बसलेलं पाहून खरंच त्या ठिकाणी नेमकी किती शांतता असेल, तिथलं जीवन नेमकं कसं असेल याचाच अंदाज चाहते लावतना दिसत आहेत. निसर्गाच्या अधिक जवळ गेलेल्या आणि त्याला खऱ्या अर्थान जगणाऱ्या परिणीतीचा हा अंदाज नक्कीच सर्वांच्याच मनावर हळुवार फुंकर टारणारा आहे.