मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अतिशय कमी वेळात प्रसिद्धीझोतात आलेल्या काही अभिनेत्रींमध्ये गेल्या काळात एक नाव सातत्यानं पुढे येताना दिसलं आहे. हे नाव अशा एका अभिनेत्रीचं आहे, जिच्या आईनंही बॉलिवूडचा एक काळ गाजवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोल्ड भूमिका साकारतच अभिनेत्रीनं तिच्या सौंदर्याच्या बळावर चाहत्यांना घायाळ केलं आणि तिच्यानंतर आता तिची लेकही आपल्या अदांनी सर्वांनाच घायाळ करताना दिसत आहे. 


70 चं दशक गाजवणारी ही अभिनेत्री आहे, अलाया फर्नीचरवाला (Alaya Furniturewala). वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षात अलायानं तिच्या मादक अदांनी सर्वांनाच बेभान केलं आहे. 




आतापर्यंत तिनं फारसे चित्रपट साकारले नाहीत, पण सोशल मीडिया आणि मॉडेलिंगच्या निमित्तानं मात्र ती सतत चर्चेत असते. 1994 मध्ये पूजा बेदीनं इब्राहिम फर्निचरवालाशी लग्न केलं. पण, त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. याच नात्यात त्यांना दोन मुलंही झाली. 




अलायाचं नाव सर्वाधिक चर्चेत त्यावेळी आलं, जेव्हा तिला बाळासाहेब ठाकरे यांचा नातू, ऐश्वर्य ठाकरे याच्यासोबत पाहिलं गेलं. सूत्रांच्या माहितीनुसार अलाया आणि ऐश्वर्य (जयदेव ठाकरे यांचा मुलगा) एकमेकांचे फार चांगले मित्र आहेत. 


काही काळापूर्वीच त्यांच्या या नात्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या होत्या. पण, आपली कौटुंबीक मैत्री असल्याचं म्हणत अलायानं या नात्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. 



तिथं आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या मैत्रीच्या चर्चांनी सर्वांच्या नजरा वळवलेल्या असतानाच इथं आता अलाया आणि ऐश्वर्यच्या मैत्रीवरही सर्वांच्याच नजरा खिळत आहेत. थोडक्यात काय, तर ठाकरेंची आणखी एक बोल्ड मैत्रीण प्रसिद्धीझोतात येत आहे.