मुंबई:  'देसी गर्ल' अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा विदेशी प्रियकर निक जोनास आता लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात साखरपुडा केल्यानंतर या दोघांच्या विवाहसोहळ्याविषयी चाहत्यांमध्येच नव्हे, तर संपूर्ण कलाविश्वातही बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. याच चर्चांमध्ये आता विषय रंगू लागला आहे, तो म्हणजे प्रियांका आणि निकच्या लग्नाच्या तारखेचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून 'देसी गर्ल'च्या लग्नसमारंभाला सुरुवात होणार असल्याचं कळत आहे. 


जोधपूरमध्ये मोठ्या थाटात हा डेस्टिनेशन वेडिंग सोहळा रंगणार आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांका निकच्या विवाहसोहळ्याची आखणी ही तीन दिवसांमध्ये करण्यात आली आहे. 


३० नोव्हेंबरपासून ते २ डिसेंबरपर्यंत विवाहसोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. 'पॅलेस वेडिंग' या अनोख्या संकप्लनेला प्रियांकाच्या विवाहसोहळ्यासाठी पसंती देण्यात आल्याचं कळत आहे. 


काही दिवसांपूर्वी खुद्द प्रियांका आणि निकनेच त्यांच्या विवाहस्थळाची पाहणी करण्यासाठी जोधपूरला भेट दिल्याचं पाहायला मिळालं होतं. 


दरम्यान, अद्यापही या सेलिब्रिटी जोडीच्या विवाहसोहळ्याच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता आधी प्रियांका लग्नाची तारीख जाहीर करणार की निक हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.