मुंबई : बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीत काही अभिनेते असे आहेत ज्यांचे काही अभिनेत्रींबरोबर रक्ताचे नाते नसले, तरी पण ते अभिनेत्रींकडून राखी बांधून घेतात. बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीनाचा कोणीही भाऊ नाहीय. परंतु कॅटरीना ही अभिनेता अर्जून कपूरलाच आपला भाऊ मानून ती त्यालाच राखी बांधते.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडमध्ये अभिनेते शोमॅन राजकपूर यांना प्रसिध्दी अभिनेत्री निम्मी राखी बांधायची. अभिनेत्री निम्मी यांचा 'बरसात' या चित्रपटात एक रक्षाबंधनाचा सीन होता. त्या सीनच्या वेळेस राजकपूर यांनी निम्मीला बोलावलं आणि म्हटलं तूला राखीचं अर्थ माहिती आहे का? त्याच वेळेस राजकपूर यांनी निम्मीला म्हटलं माझ्या मनगटावर राखी बांध. तेव्हा पासूनच निम्मी त्यांची बहीण बनली आणि राजकपूर यांना आयूष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राखी बांधली.

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही सुद्धा अभिनेता सोनू सूद ला राखी बांधते. 'जोधा-अकबर' चित्रपटात ऐश्वर्या आणि सोनू हे दोघे बहीण - भावाच्या भूमिकेत होते. या चित्रपटानंतरही ऐश्वर्या ही सोनू सूदलाच राखी बांधते.