मुंबई : 'इन आँखों की मस्ती के... मस्ताने हजारों है...' असं म्हणत रेखा रुपेरी पडद्यावर आल्या आणि खरंच या डोळ्यांमध्ये सर्व चाहते भान हरपून बसले. रेखा या चित्रपटांतून जितक्या वेळा आपल्यासमोर आल्या, त्या प्रत्येक वेळी कोणाच्या ना कोणाच्या काळजाचा ठोका चुकला. (rekha)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रेखा यांनी बहुविध भूमिका बॉलिवूडमध्ये साकारल्या. त्यासाठी त्यांना तितकीच लोकप्रियताही मिळाली 


'अनजाना सफर' (Anjana Safar) हा त्यांचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट. असं म्हटलं जातं की रेखा यावेळी अवघ्या 15 वर्षांच्या होत्या. पण, सेन्सॉरमुळं त्यांचा हा चित्रपट 10 वर्षांनंतर प्रदर्शित झाला. 


असं म्हटलं जातं की, याच चित्रपटातील एका दृश्यासाठी त्यांना अभिनेत्यानं बळजबरीनं Kiss केलं होतं. 


अभिनेते बिस्वजीत यांच्यासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. इथं एका दृश्यामध्ये त्यांनी रेखा यांना किस करणं अपेक्षित होतं. पण, ते 5 मिनिटं होऊनही रेखा यांना किस करत राहले. 


आपल्यासोबत झालेला हा प्रसंग रेखा यांच्या डोळ्यांत पाणी आणून गेला. हा प्रसंग लैंगिक शोषणाचाच एक प्रकार असल्याची चर्चा त्यानंतर झाली होती. 


यासिर उस्मान यांच्या  'रेखा : द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकामध्ये याचा उल्लेख करण्यात आला होता. 


सदर दृश्याच्या वेळी रेखा यांच्याशी निर्माते काहीच म्हणाले नव्हते. थोडक्यात त्यांना या दृश्याबद्दल काहीच माहिती नव्हती. 


अशीही चर्चा रंगली की, हा सीन रेखा यांना त्रास देण्यासाठी मुद्दाम ठेवण्यात आला होता. सर्वकाही तयार होतं, दिग्दर्शकानं कॅमेरा रोलची ऑर्डर दिली आणि तेव्हाच बिस्वजीत एकाएकी रेखा यांना किस करु लागले. 


हे सर्व पाच मिनिटांपर्यंत सुरू राहिलं. रेखा यांना हा हादरा होता. कॅमेरा सुरुच राहिला, पण यादरम्यान दिग्दर्शकानं कट नाही म्हटलं आणि बिस्वजीत यांनीही किस करणं थांबवलेलं नव्हतं. 


रेखा या सीनदरम्यान रडतच होत्या. पण, तिथं असणाऱ्या अनेकांनीच यानंतर मात्र तिथं टाळ्या वाजवल्या होत्या. 


सेन्सॉरनं याच मुद्द्यावर हरकत व्यक्त करत हा वाद विकोपास पोहोचला होता. अमेरिकेतील 'लाईफ' या मासिकातही याचा उल्लेख करण्यात आला होता. 


या दृश्यामध्ये आपली कोणतीही चूक नसल्याचं अभिनेत्याने स्पष्टीकरण देत सांगितलं होतं. आपण हे दिग्दर्शक राजा नवाथे यांच्या सांगण्यावरून केल्याचं त्यांनी सांगितलं. 


हे सर्व आपण आपल्या आनंदासाठी नव्हे, तर चित्रपटाची गरज म्हणून केल्याचं सांगितलं. रेखा मात्र यावेळी आपला विश्वासघात केल्याच्या भावनेने अतिशय संतापल्या होत्या.