मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर असंख्य अनुत्तरित प्रश्नांनी डोकं वर काढलं. याच प्रश्नांची सातत्यपूर्ण साखळी पाहता घडामोडींना वेग आला आणि सुशांतची प्रेयसी Rhea Chakraborty  रिया चक्रवर्ती हिच्याभोवती असणारा अडचणींचा फास आणखी घट्ट होणाना दिसला. ईडीपुढे हजर राहत चौकशीच्या सत्रांना सामोऱ्या जाणाऱ्या रियानं आता या सर्व प्ररणाबाबत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार हा रियाचा पलटवार आहे. पण, त्यात रियाच्या वाट्याला नेमकं काय येणार हे मात्र अद्यापही अस्पष्टच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुकीच्या पद्धतीनं मीडिया ट्रायल सुरु असून, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आपल्याला त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवण्यात येत आहे, असं म्हणत तिच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे. रियाच्या म्हणण्यानुसार सुशांतप्रमाणंच मागील ३० दिवसांमध्ये अभिनेता आशुतोष भाकरे, समीर शर्मा यांनीही आत्महत्या केली. पण, यांबाबत माध्यमांनी फारशी तसदी घेतलेली दिसत नाही. 


बिहारमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळणही प्राप्त झालं आहे. याच आधारे काही महत्त्वाचे मुद्दे मांडत रियानं दाखल केलेल्या याचिकेमध्ये 2 जी आणि तलवार प्रकरणांचा संदर्भ देत यामध्ये जशी मीडिया ट्रायल करण्यात आली आणि पुढं जाऊन आरोपींना न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं हा सारा असाच प्रकार असल्याचं म्हटलं. 



सदर प्रकरणाला अतिरंजित प्रकारे दाखवण्यात येत असून, आपल्या हक्कांची पायमल्ली होत असल्याची बाब रियानं या याचिकेत मांडली आहे. शिवाय, कोट्यवधींच्या व्यवहाराची चौकशी करणाऱ्या ईडी आणि सीबीआयला कधीही प्रकाशमान बाजू दिसणार नाही असं म्हणत त्यांच्या हाती काही लागणार नसल्याचं या याचिकेत म्हटलं गेलं असल्याचं कळत आहे. आपल्याला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं अडकवलं जात असल्याचं म्हणत रियानं सर्वोच्च न्यायालयाकडे आपल्याला संरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली आहे. सोबतच राजकीय हेतूसाठी आपला वापर करण्यात येऊ नये असा सूर याचिकेत आळवण्यात आला आहे.