मुंबई : कोरोना व्हायरस coronavirus च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तणावाचं वातावरण असतानाच अनेक गोष्टी, कार्यक्रमांची आखणी या साऱ्याचं वेळापत्रक कोलमडून पडलं. जवळपास सर्वांच्याच खासगी जीवनावर याचे थेट परिणाम झाले. अगदी सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यातून बचावले नाहीत. याचीच प्रचिती सध्या एका सेलिब्रिटी जोडीच्या निर्णयातून येत आहे. जिथं लग्नाचा बेत लांबणीवर गेल्यामुळं या सेलिब्रिटी जोडीनं अखेर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय़ घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही जोडी आहे अभिनेत्री रिचा चड्ढा आणि तिचा प्रियकर अभिनेता अली फजल यांची. यंदाच्याच वर्षी रिचा आणि अली विवाहबंधनात अडकणार होते. पण, कोरोनाच्या संकटामुळं आखलेले बेत काही मार्गी लागले नाहीत. शेवटी प्रेमाच्या या नात्याखातर ही जोडी लिव्ह इनच्या निमित्तानं एकाच छताखाली राहण्यासाठी एकत्र आली. 


सध्या अली आणि रिचा एका सुरेख अशा सी व्ह्यू असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. मुंबई मिररशी संवाद साधताना घरात राहताना अली नेमका असतो तरी कसा, यावरुन तिनं पडला उचलला. तो फारच मजेशीर असून, कामांमध्ये मदत करायला प्राधान्य देतो असं ती म्हणाली. 



 


एकत्र येऊन निर्णय घेण्याच्या या नव्या वळणाबाबत आनंद व्यक्त करत रिचानं अलीच्या पाककलेचं कौतुक केलं. इतकंच नव्हे तर घराच्या गॅलरीमध्ये ऑरगॅनिक गार्डनही उगवण्यासाठी ही जोडी उत्सुक आहे. त्यामुळं ही जोडी या नव्या प्रवासासाठी सध्या बरीच उत्सुक आणि उत्साही दिसत आहे असं म्हणायला हरकत नाही.