PHOTO : ती पॉर्न स्टार नव्हती... `शकीला`चा बोल्ड अंदाज पाहिला?
शकीला यांचा आतापर्यंतचा प्रवास या बायोपिकमधून साकारण्यात येणार आहे.
मुंबई : एखाद्या व्यक्तीचा जीवनप्रवास अगदी प्रभावीपणे साकारत आजवर बरेच बायोपिक चित्रपट जगतात साकारण्यात आले आहेत. विविध विषय, व्यक्ती आणि त्यांच्या प्रवासावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका चित्रपटातं नाव जोडलं जात आहे. किंबहुना त्या चित्रपटाचं पोस्टरही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अडल्ट स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री शकीला यांचा आतापर्यंतचा प्रवास या बायोपिकमधून साकारण्यात येणार आहे. अभिनेत्री रिचा चड्ढा या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.
इंद्रजित लंकेश दिग्दर्शित या चित्रपटाच्या पोस्टरवर शकीला यांच्या रुपातील रिचाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. भरपूर दागिने आणि एकटक रोखलेली नजर या पोस्टरला आणखी प्रभावीपणे सादर करत आहे.
या पोस्टरवर शकीला असं लिहिण्यात आलं असून, नॉट अ पॉर्नस्टार ही टॅगलाईन अनेकांचच लक्ष वेधत आहे. शकीला यांनी अनेकांचे बोलही ऐकावे लागले होते, हे पोस्टवर दिसणाऱ्या काही ओळी सांगत आहेत.
समाजाचा विरोध, चित्रविचित्र व्यक्ती, त्यांच्या शरीरावरून फिरणाऱ्या भेदक नजरा, असूरी वृत्ती या साऱ्याचा सामना करत शकीला यांनी या कलाविश्वात तग धरला. त्यांचा हाच खडतर प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे.
सध्याच्या घडीला या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, रिचाने चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली असल्याचं तिच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून लक्षात येत आहे. अद्यापही या चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली नसली तरीही पोस्टरवर नमूद केल्यानुसार पुढच्या वर्षी एप्रिल, मे महिन्याच्या सुमारास हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळत आहे.