मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) दर दिवशी अनेक चेहरे त्यांचं नशीब आजमवण्यासाठी येतात. यापैकी काहींना या झगमगाटामध्ये आपलं स्थान भक्कम करण्याची संधी मिळते. तर काही मात्र कुठच्या कुठे फेकले जातात. अनेकदा तर गाजलेल्या चित्रपटातील कलाकारांनाही अशा संघर्षाचा सामना करावा लागतो. अभिनेत्री रिमी सेन त्यापैकीच एक. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिमी सध्या चित्रपट जगतापासून काहीशी दूरच आहे. जवळपास 10-11 चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिनं बॉलिवूडमधून काढता पाय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच रिमीनं एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये तिनं बॉलिवूडमधील आपल्या अनुभवांचं कथन केलं होतं. 


'धूम', 'हंगामा' यांसारख्या चित्रपटांमध्ये मला फर्निचरसारख्याच भूमिका मिळाल्या होत्या, असं वक्तव्य करत रिमीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ''मला जे मिळालं ते माझ्या वाट्याचं नव्हतं. मी खूप सारे म्युझिक व्हिडीओ केले. आमिर खानसोबत एक जाहिरातही केली होती. यानंतर मी हंगामा चित्रपट स्वीकारला. त्यामुळे माझ्यासाठी हा नशीबाचा भाग होता. मला फक्त विनोदी चित्रपटच मिळत होते. 'धूम', 'फिर हेरा फेरी', 'हंगामा', 'गोलमाल' हे चित्रपट केले. पण, त्यामध्ये माझी भूमिका फर्निचरसारखीच होती. त्यावेळी चित्रपटसृष्टी पुरुषप्रधान होती. आज मात्र कथानक मध्यवर्ती भूमिकेत असतं. त्यावेळी इथं एखादा अभिनेता होता. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळं हे सारंकाही बदललं आहे'', असं रिमी म्हणाली होती. 


2000 या वर्षी रिमीनं अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. बंगाली चित्रपट Paromitar Ek Din या चित्रपटात ती झळकली होती. यानंतर ती Ide naa modati prema lekha या तेलुगू चित्रपटातून झळकली होती. 2003 मध्ये तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 'हंगामा' हा तिचा पहिला चित्रपट होता. चित्रपटाला चांगली लोकप्रियता मिळाली. पण, रिमीला मात्र यात फार लहानशीच भूमिका मिळाली होती. रिमी कधीच बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत दिसली नाही. बिग बॉसच्या 9 व्या पर्वातही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.