मुंबई : बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री ती सुंदर दिसण्याबरोबरच अभिनयातही उत्तम होती. तिने अनेक हीट सिनेनांमध्येही काम केलं आहे आणि इंडस्ट्रीत आपली छाप सोडली. परंतु एका एसएसएसमुळे तिच्या संपूर्ण करिअरला ग्रहण लागले आणि तिचं करिअर संपलं. आता ती अभिनेत्री सगळ्यांच्या नजरेपासून लांब आहे. रिया सेन असे या अभिनेत्रीचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिया सेन ही या बॉलीवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, जिच्या कारकिर्दीला वादांच्या भोवऱ्याने असे ग्रहण लागले होते की हे ग्रहण कधीच संपले नाही. रिया सेन ही हिंदी आणि बंगाली चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेन यांची मुलगी आहे.


रिया सेनच्या हिट चित्रपटांमध्ये 'स्टाईल', 'झंकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी-मनी' हेच चित्रपट आहेत. फार कमी लोकांनी हे चित्रपट पाहिले असतील, परंतु तिच्याशी निगडित वाद मात्र लोकांच्या चांगलेच लक्षात असतील. त्यापैकी एका वादाने तर अभिनेत्रीला यशाच्या चकाकीतून बदनामीच्या अंधारात आणले.


रिया सेनने 1991 मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती अभिनेत्रीला लहान बहिण देखील आहे. तिचे नाव रायमा सेन आहे. रिया सेन त्रिपुराच्या राजघराण्यातील आहे. त्यांचे वडील भरत देव वर्मा हे कूचबिहारच्या राणी इला देवी यांचे पुत्र आहेत.


रियाला पहिली ओळख फाल्गुनी पाठकच्या 'चुडी जो खानकी हाथ में' या गाण्यातून मिळाली. स्टार किड होऊनही रिया यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वत:चा ठसा उमटवू शकली नाही. रिया तिच्या चित्रपटांमधील बोल्ड आणि हॉट सीन्समुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता रिया पूर्णपणे बंगाली चित्रपटांकडे वळली आहे.


अफेअर लाइमलाइटमध्ये राहायचे


रिया सेन नेहमीच तिच्या अफेअरमुळे चर्चेत असते. तिच्या बॉयफ्रेंड लिस्टमध्ये अक्षय खन्ना ते लेखक सलमान रश्दी यांच्या नावांचा समावेश आहे. तर रश्दीचे वय रियापेक्षा दुप्पट होते. दोघांनी ही गोष्ट कधीच मान्य केली नाही, पण काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघेही वेगळे झाले.


2011 मध्ये रिया अनेक वेळा स्टेडियममध्ये श्रीसंतला चिअर करताना दिसली होती. त्यामुळे श्रीसंतसोबत देखील तिचे अफेअर असल्याचे बोलले जाते.  रिया सेनने 2017 मध्ये तिचा प्रियकर शिवम तिवारीसोबत लग्न केले.


रियाचा mms लीक


रियाच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद म्हणजे तिचा अभिनेता अश्मित पटेलसोबतचा एमएमएस लीक होणे. या व्हिडीओमध्ये ते दोघेही एकमेकांना किस करतना दिसत आहेत. 2005 मध्ये रिया आणि अश्मित रिलेशनशिपमध्ये होते. त्यादरम्यान रियाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता.


लोकांचा आरोप आहे की रियानेच प्रसिद्धीसाठी हा व्हिडीओ लीक केला आहे. मात्र दोघांनीही हा व्हिडीओ फेक असल्याचे म्हटले होते. या वादामुळे सर्व काही बदलले आणि रियाला बॉलिवूड इंडस्ट्री सोडावी लागली.