मुंबई : संपूर्ण कलाविश्वात सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे #MeToo या चळवळीची. लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवत या चळवळीत अनेकजण सहभागी झाले असून अन्यायाला वाचा फोडली आहे. पण, कुठेतरी या साऱ्याचा वापर चुकीच्या मार्गांनीही होताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणजे अफवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याच्या बऱ्याच अफवांनीही आता डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. याचाच प्रत्यय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला आला. 


'किझी और मॅनी' या आगामी चित्रपटामध्ये व्यग्र असणाऱ्या सुशांतवर सहअभिनेत्री संजना सांघी हिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करण्यात आल्याच्या चर्चा होत्या. ज्यामुळे सुशांत अडचणीत येण्यची चिन्हं होती.


आता मात्र त्याने सुटकेचा नि:श्वास सोडलेला असावा. कारण, खुद्द संजनानेच ट्विट करत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 


'बऱ्याच दिवसांनी परदेशातून परतल्यानंतर किझी और मॅनी या चित्रपटाच्या सेटवर माझ्याशी असभ्य वर्तन झाल्याच्या वायफळ चर्चा माझ्या  कानावर पडल्या', असं तिने ट्विटमध्ये म्हटलं. 



'मुळात माझ्यासोबत चित्रपटाच्या सेटवर असं काहीच घडलेलं नाही; त्यामुळे या चर्चा थांबवा', असं म्हणत तिने एकंदरच चित्र स्पष्ट करुन दिलं. 



दरम्यान, आपल्यावर होणारे आरोप पाहून सुशांतने ट्विट करत त्याविषयीची नाराजी व्यक्त केली होती. पण, आता मात्र खुद्द संजनानेच ट्विट केल्यामुळे य़ा चर्चांना पूर्मविराम मिळेल असं म्हणणं योग्य ठरेल.