मुंबई : अभिनेत्री सारा अली गेल्या काही दिवसांपासून बी- टाऊनच्या बऱ्याच चर्चांमध्ये अग्रस्थानी दिसत आहे. आगामी चित्रपट असो किंवा खासगी आयुष्यातील एखादी बाब असो, सारावर कोणाच्या नजरा खिळल्या नाहीत असं होतच नाही. सैफ अली खान याची ही लेक सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. साराच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या अदा तर पाहायला मिळतात. पण, तिच्यातील शायराना अंदाजही याच माध्यमातून सर्वांसमोर येतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच एका मुलाखतीत सोशल मीडियावर भरभरुन प्रेम करणाऱ्या या साराने एक खुलासा केला आहे. इतरांप्रमाणेच तीसुद्धा इतर युजर्सच्या अकाऊंटवर नजर ठेवून असते. आता त्या व्यक्ती कोण याचा स्पष्ट उलगडा तिने केला नाही. पण, एका अशा व्यक्तीचं अकाऊंट जे मी कायमच पाहते ते म्हणजे दीपिका पदुकोण हिचं. 


चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दीपिकाच्या अदांनी सारावरही वेगळीच जादू केली आहे. त्यामुळेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती दीपिकावर नजरच ठेवते असंच म्हणावं लागेल. 'लव्ह आज कल' या चित्रपटातून सारासोबत स्क्रीन शेअर करणारा अभिनेता कार्तिक आर्यनही सतत मोबाईल फोनचा वापर करत असतो, हेसुद्धा साराने या मुलाखतीत सांगितलं. शिवाय आपला भाऊसुद्धा मोबाईलचा सर्वाधिक वापर असल्याचं तिने या मुलाखतीत सांगितलं. हे सांगत असताना तिने मुलं सर्वाधिक फोनच्या आहारी गेलेले असतात, हा विचारही मांडला. 



येत्या काळात सारा 'लव्ह आज कल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनात साकारण्यात आलेल्या या चित्रपटातून सारा आणि कार्तिक ही नवी जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर स्क्रीन शेअर करणार आहे.