मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजे ७ डिसेंबर २०१८ ला साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या दिवसाच्या आठवणीत साराने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. 'मला विश्वास बसत नाही की इतका काळ निघून गेला आहे. 'केदारनाथ' चित्रपट माझ्या आयुष्यातील अतिशय महत्त्वपूर्ण भाग असल्याचं' साराने पोस्टमध्ये लिहिलं आहे.



गेल्या वर्षी साराने अभिषेक कपूर दिग्दर्शित 'केदारनाथ' चित्रपटातून डेब्यू केला. साराने संपूर्ण टीमचे आभार मानत, तिचा चित्रपटातील सह-कलाकार सुशांत सिंह राजपूतचेही आभार मानले आहेत. 



सारा अली खान आगामी 'लव आज कल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाशिवाय सारा 'कुली नंबर १' चित्रपटातून वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.