मुंबई : सोशल मीडिया किंवा समाज माध्यमांच्या मदतीने कलाकार मंडळी चाहत्यांसोबत एक कायमस्वरुपी नातं प्रस्थापित करतात. पाहता पाहता हे नातं इतकं दृढ होतं, की आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे, याविषचीही चाहत्यांना माहिती होऊ लागते. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका निभावतात ती ही समाज माध्यमं. याच माध्यमाचा सुरेख वापर करणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडचा नवाब, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान हिने 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पदार्पणातूनच साराने तिच्या अभिनयाची छाप सोडली. ज्यानंतर या कलाविश्वात तिला स्वत:ची अशी वेगळी ओळखही मिळाली. असं असलं तरीही साराला इथवर पोहोचण्यासाठी बरीच मेहनतही घ्यावी लागली होती. संघर्ष तिलाही चुकला नव्हता. 



सोशल मीडियावर तिने नुकताच शेअर केलेला फोटो पाहता याचा प्रत्यय येत आहे. आई, अमृता सिंग हिच्यासोबतच एक फोटो साराने शेअर केला. ज्यावर एक कॅप्शन देत तिने स्वत:ची खिल्लीही उडवली. साराने शेअर केलेला हा फोटो पाहता प्रथमदर्शनी फोटोतील सारा आणि आताची सारा एकच आहे, यावर विश्वासच बसच नाही. 



स्थुलतेमुळे सारा या फोटोमध्ये अतिशय वेगळी दिसत आहे. तिचा हा फोटो आणि सध्याचं रुप यांमध्ये बराच फरक आहे. मुख्य म्हणजे साराचा हा फोटो पाहता तिने या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अतिशय समर्पकपणे आणि जिद्दीने बऱ्याच गोष्टी मिळवल्या आहेत. तिच्या याच यशाबद्दल आणि एकाग्रतेबद्दल कमेंट बॉक्समध्ये सेलिब्रिटी मित्रांकडून तिचं कौतुक झालं. तर, सारासोबतच्या नात्यामुळे चर्चेत असणाऱ्या कार्तिक आर्यन याने कमेट करत, 'अरे ही मुलगी तर सारा अली खानसारखी दिसत आहे.... ', अशी विनोदी कमेंट केली. साराच्या फोटोवर कार्तिकची ही कमेंट पाहता त्यांच्या या 'खास मैत्री'नेही अनेकांचं लक्ष वेधलं.