मुंबई : अभिनेता शाहरुख खान त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत कायम चाहत्यांशी संपर्क साधत असतो. सोशल मीडियावर तो पोस्ट करत असणारा एखादा फोटो असो, किंवा मग एखादा लहानसा व्हिडिओ असो. शक्य त्या, सर्व माध्यमांतून किंग खान चाहत्यांशी असणारं हे नातं आणखी दृढ करताना दिसतो. किंबहुना तो चाहत्यांशी संवादही साधतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखने नुकतच ट्विटरच्या माध्यमातून 'Ask me anything' नावाचं सत्र घेतलं. ज्यामध्ये त्याने कित्येक चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. प्रश्नांच्या याच गर्दीत शाहरुखला एक असा प्रश्न विचारण्यात आला, ज्याचा संबंध थेट त्याच्या राहत्या घराशीच होता. 


एका ट्विटर युजरने किंग खानला त्याच्या राहत्या घरी, म्हणजेच 'मन्नतमध्ये एक रुम भाड्याने घेण्यासाठी किती किंमत द्यावी लागेल' असा प्रश्न विचारण्यात आला. ज्याचं उत्तर शाहरुखने त्याच्याच अंदाजात दिलं. 'मन्नत'मध्ये एका रुमचं भाडं देण्यासाठी एक गोष्ट गरजेची असल्याचं त्याने स्पष्ट केलं. ३० वर्षांच्या मेहनतीमध्ये हे शक्य होईल... असं शाहरुख ट्विट करत म्हणाला. त्यामुळे आता किंग खानसारख्या आलिशान घरात राहाण्याची इच्छा असेल तर, त्यावर मेहनत करण्यावाचून पर्याय नाही हेच खरं. 


वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप




दरम्यान, चाहत्यांच्या याच प्रश्नाची नव्हे, तर इतरही काही भन्नाट प्रश्नांची शाहरुखने उत्तरं दिली. क्रिकेट विश्वाशी संबंधित प्रश्न शाहरुखपुढे मांडला असतानाही त्याने अतिशय शिताफीने तो हाताळला. आयपीएलमध्ये कोलकात्याच्या संघामध्ये दिनेश कार्तिकऐवजी शुभमन गिलला कर्णधारपद केव्हा देणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देत शाहरुख म्हणाला, 'जेव्हा तुम्हाला कोलकात्याच्या संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नेमण्यात येईल तेव्हा... '