बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Sharaddha Kapoor) सध्या आपला आगामी चित्रपट 'स्त्री 2' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. स्त्री चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांसह श्रद्धा कपूरलाही फार अपेक्षा आहेत. यादरम्यान श्रद्धा कपूरच्या खासगी आयुष्यात सगळं काही आलबेल नसल्याचं दिसत आहे. याचं कारण श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर त्याचा कथित प्रियकर राहुल मोदीला अनफॉलो केलं आहे. श्रद्धा कपूरने फक्त राहुल मोदीच नव्हे तर त्याच्या कुटुंबासह श्वानालाही अनफॉलो केलं आहे. रेडिटवर एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला असून याम्ये तिच्या इंस्टाग्राम फॉलोअिंग लिस्टमधून राहुल मोदीचं नाव गायब झाल्याचं दिसत आहे. यानंतर नेटकरी त्यावर व्यक्त होत आहे. 


श्रद्धा कपूरचे चाहते झाले व्यक्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका युजरने गंमतीने कमेंट केली आहे की, "अफवा आहे की तिने काही दिवसांपूर्वी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, पण त्याने तिला 'ओ स्त्री कल आना (स्त्री, उद्या ये)' असा मजकूर पाठवला. दुसऱ्या युजरने लिहिले, “कुत्र्याला अनफॉलो करणे जरा अतीच आहे”.


एका चाहत्याने श्रद्धाची बाजू घेतली असून लिहिलं आहे की, “कारण श्वानाचा मालक हे अकाऊंट हाताळत होता, कुत्रा स्वतः नाही”. एका वापरकर्त्याने मत व्यक्त केले की, "इंस्टाग्राम अकाऊंट असणाऱ्या कुत्र्यांचे प्रमाण जरा जास्तच आहे." दुसऱ्या व्यक्तीने निदर्शनास आणून दिलं की, “मला आशा आहे की हे स्त्रीच्या प्रमोशनसाठी किंवा उगाच हवा करण्यासाठी नाही. ते प्रामाणिकपणे खूप कमी होईल”.



श्रद्धा कपूर आता 'स्त्री 2' मध्ये तिच्या गूढ पात्राची पुनरावृत्ती करताना दिसणार आहे. पहिल्या भागात स्त्रीच्या भावनांवर चित्रपट आधारित होत. पण स्त्री 2 मध्ये सरकटे नावाचा एक नवीन खलनायक आहे, ज्याने स्त्रीला भूत बनवले आहे. श्रद्धा व्यतिरिक्त राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी देखील त्यांच्या भूमिका आहेत. 


स्त्री 2 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित जॉन अब्राहमच्या 'वेदा', अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' आणि विक्रमच्या तमिळ ॲक्शन-थ्रिलर 'थंगलान' यांच्याशी चित्रपटाची टक्कर होणार आहे.