मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याचं नाव अश्लील व्हिडीओ अर्थात पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography controversy ) गोवलं गेलं आणि याच्याशी जोडले गेलेले अनेक धागेदोरे बाहेर आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पाच्या खासगी आयुष्यावरही याचे परिणाम झाल्याचं म्हटलं गेलं. पतीला बेड्या ठोकल्यानंतर शिल्पा 'सुपर डान्सर चॅप्टर 4' या रिअॅलिटी शोच्या चित्रीकरणासाठीही जात नव्हती. तिच्या जागी अनेक सेलिब्रिटींनी जवळपास महिनाभरासाठी या कार्यक्रमात पाहुणे परीक्षक म्हणून उपस्थिती लावली होती. ज्यानंतर अखेर आता शिल्पा या कार्यक्रमामध्ये परतली असल्याचं म्हटलं जात आहे. 


Engagment पूर्वीही Vicky Kaushal आणि Katrina Kaif मधील प्रेमाचे 'ते' क्षण झाले Viral 


 


जीवनातील आव्हानात्मक काळाला सामोरं गेल्यानंतर शिल्पा आता पुन्हा एकदा या सेटवर परतत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबतचा व्हिडीओ शेअरही करण्यात आला आहे. जिथं शिल्पा व्हॅनिटी वॅनमधून सेटपर्यंत जाण्यासाठी निघतानचा तिच्यासमोर कॅमेरा येतो. तेव्हा ती कॅमेराकडे पाहून हात उंचावत स्मितहास्य करताना दिसते. यावेळी शिल्पाचा चेहरा खूप काही बोलून गेला. 



शिल्पानं परत कार्यक्रमात परीक्षक म्हणून तिची जबाबदारी सांभाळावी असं सर्वांनाच वाटत होतं. कार्यक्रमाचे निर्माते सातत्यानं तिच्या संपर्कात होते. अखेर तिनं सेटवर परतण्याचा निर्णय घेतला. शिल्पा येताच सेटवर तिचं मोठ्या उत्साहात स्वागत झाल्याचं म्हटलं जात आहे. या निमित्तानं तिच्या जीवनात काही सकारात्मक बाब घडतानाही दिसत आहे.