VIDEO : २४ कॅरेट सोन्याचं आईस्क्रीम खाणाऱ्या `या` अभिनेत्रीला ओळखलं?
हे आईस्क्रीम खाण्यासाठी तुम्हाला `या` ठिकाणी पोहोचावं लागेल ...
मुंबई : कलाविश्वात दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच एका अभिनेत्रीचा व्हिडिओही सर्वांचच लक्ष वेधत आहे. तो व्हिडिओ गाजण्याचं कारणही तसंच आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्य़ात आलेल्या त्या व्हिडिओमध्ये ही बॉलिवूड अभिनेत्री आईस्क्रीम खाताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवल? पण, हे आईस्क्रीम साधंसुधं नसून, ते फार खास आहे. कारण, त्यावर २४ कॅरेट सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे.
हो.... अगदी बरोबर ऐकलं. सोन्याचा वर्ख. हाँग काँगच्या सफरीवर गेलेल्या बी- टाऊन अभिनेत्रीने हे आईस्क्रीम खाल्लं असून, त्याचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.
मनसोक्तपणे त्या आईस्क्रीमची चव चाखणारी ही अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी.
शिल्पा दर रविवारी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही सुरेख अशा गोड पदार्थांचे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते. याच सत्रात तिने यावेळी चक्क सोन्याचा वर्ख असणाऱ्या आईस्क्रीमचा व्हिड़िओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात आहे.
शिल्पाने पोस्ट केलेला हा व्हिडिओ पाहून, तुम्हीही आखताय का हे २४ कॅरेट सोन्याचा वर्ख असणारं आईस्क्रीम खाण्याचा बेत?