Raj Kundra Viral Video: मागच्या महिन्यात राज कुंद्राचं प्रकरण खूप जास्त गाजलं. पॉर्न फिल्म्स बनवण्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली होती. शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा (Shilpa Shetty's Husband Raj Kundra Case) असल्यानं राज कुंद्रा हे नावं चांगलंच गाजलं. राज कुंद्रा सुटका झाली आहे परंतु अद्यापही राज कुंद्रा सार्वजनिक आयुष्यात फारसं कमी वावरताना दिसतो. (Bollywood actress shilpa shetty husband raj kundra hides his face with helmet and zipper netizens trolled him video viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता नुकताच त्याचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.(Raj Kundra Viral Video) हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांची पुरती खिल्ली उडवली आहे. पॉर्नाेग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्रा अजून तोंड लपवून बाहेर फिरतोय असं म्हणत अनेकांनी त्याच्या फिजिती करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी राज कुंद्राचं ते प्रकरण जोडत राज कुंद्रा आता तोंड लपवतं फिरतोय असं म्हणत त्याल जोरदार ट्रोल केलं आहे. (Raj Kundra Trolled for his New Look)


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राज कुंद्रा काळ्या रंगाचं हेलमेट घातलं आहे आणि त्यावर हूडी सारखं झीपर घातलं आहे. या लुकमुळे त्याला ओळखताच आलं नाही की तो राज कुंद्रा आहे. त्यातून एका महिलेनं त्याच्यासोबत एक सेल्फीही काढला. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी पुष्कळ नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एकानं लिहिलं आहे की 'असे कारनामे केल्यामुळे आता त्याला तोंड बंद करूनच फिरावं लागेल'. तर एकानं असंही लिहिलंय की 'याचा हा लुक पाहून स्विक्ड गेम्ससाठी राज कुंद्रा ऑडिशन देणार आहे.'


राज कुंद्रा सध्या कुठल्याच सार्वजनिक ठिकाणी दिसत नसून नुकताच तो एअरपोर्टच्या ठिकाणी स्पॉट झाला होता.