मुंबई : प्रत्येकाच्याच आयुष्यात मैत्री आणि मित्रमंडळी अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत असतात. काही वेळा अशा येतात जेव्हा हाच मित्रपरिवार कुटुंबापेक्षाही महत्त्वाचा होतो. तर काही असे प्रसंग येतात जेव्हा मित्रपरिवारामुळे आपल्याला नको त्याच गोष्टी आणि अनुभव घ्यावे लागतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला अशाच अनुभवाचा सामना करावा लागला होता. (Shilpa shetty)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत शिल्पानं याबाबता खुलासा केला. मित्रांमुळेच तिला प्रेमभंगाचा सामना करावा लागला होता. 


ज्या व्यक्तीसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती, तो तिच्यासोबत फक्त आणि फक्त याच कारणासाठी तिच्यासोबत होता कारण, तिच्या मित्रांनी त्याच्याशी शिल्पासोबत त्यानं रिलेशनशिपमध्ये येण्याची पैज लावली होती, असं शिल्पानं सांगितलं. 


हे सारंकाही एका चित्रपटाप्रमाणं वाटत असावं, पण हेच खरं आहे असंही शिल्पानं स्पष्ट केलं. पुढे जाऊन त्या मुलानं शिल्पाशी ब्रेकअप केलं. कारण, पैज जिंकणं हाच त्याचा एकमेव उद्देश होता. 


हे वास्तव जेव्हा शिल्पासमोर आलं त्यावेळी तिला मोठा हादरा बसला. या एका घटनेनं तिच्यावर मोठा परिणाम झाला होता. 


शिल्पासोबत घडलेली गोष्ट पाहता, काही मित्र असेही असतात ज्यांच्याशी मैत्री न होणंच उत्तम, याचीच जाणीव ठेच लागल्यावर होते. 


दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी तिच्या खासगी जीवनातील बऱ्याच आव्हानात्मक काळातून पुढे आली. पती मोठ्या संकटात सापडलेला असतानाच तिनं माध्यमांसमोर येणंही कमी केलं होतं. अखेर पती राज कुंद्रा परतल्यानंतर शिल्पाचं आयुष्य आता कुठे पूर्वपदावर येऊ लागलं आह