मुंबई : उन्हाळा म्हटलं की अनेकांच्याच चेहऱ्यावर बारा वाजतात असं म्हटलं तरीही अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यातही गेल्या काही दिवसांपासून सतत वर जाणारा तापमानाचा पारा पाहता उन्हाच्या या झळा सर्वांसाठीच त्रासदायकही ठरु लागल्या आहेत. अशा वेळी आरोग्यदायी मार्गांनी परिस्थितीचा सामना करत उन्हाळ्याशी दोन हात करण्यालाच अनेकजण प्राधान्य देतात. हिंदी कलाकार विश्वातील कलाकार मंडळीही यात मागे राहिलेले नाहीत. याचच उदाहरण पाहायला मिळत आहे, ते म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या एका सोशल मीडिया पोस्टमधून. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादा नवा लूक असो, व्यायाम प्रकार असो किंवा शारीरिक सुदृढतेचं महत्त्व. या साऱ्याशी निगडीत बऱ्याच पोस्ट शिल्पा शेअर करत असते. ज्याचा चाहत्यांनाही बऱ्याच अंशी फायदाही होतो. अशा या अभिनेत्रीने आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही खाद्यपदार्थांच्या कृती दाखवण्यात सुरुवात केली आहे. 


शिल्पाने आतापर्यंत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन उन्हाळ्याचं एकंदर वातावरण पाहता आईस्क्रीम आणि सोलकढीच्या रेसिपी शेअर केल्या आहेत. तिने दाखवलेल्या सोल कढीच्या रेसिपीला बरेच व्ह्यूज मिळाले आहेत. अतिशय मोजक्या साहित्यात तिने ही सोलकढी स्लशी बनवली असून, उन्हाळ्यात तिच्या प्राशनाने होणाऱे फायदेही व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहेत. 


(शिल्पाने शेअर केलेली रेसिपी पाहण्यासाठी येथे क्लिक करा)


(तिने बनवलेल्या आईस्क्रीमची रेसिपी पाहण्यासाठी येथे क्लिक करा)


आपल्या सासरेबुवांना सोलकढी फार आवडत असल्याचं सांगत तिने ही रेसिपी त्यांना समर्पित केली आहे. अभिनयानंतर आता शिल्पाचं हे रुप अनेकांचीच दाद मिळवत आहे. करिअर आणि कुटुंब यासोबतच आरोग्याकडेही मोठ्या गांभीर्याने पाहणारी शिल्पा नेहमीच निरोगी राहणीमानाला प्राधान्य देताना दिसते. म्हणून अनेकांसाठी ती 'सुपरवुमन'ही ठरते.