मुंबई : काही दिवसांपूर्वीच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. दीदींना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबासमवेत चाहता वर्गही हळहळला. कुटुंबातील एक मोठा आधार गमावल्याची प्रतिक्रिया मंगेशकर घराण्यातील प्रत्येकानं दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच त्यांच्याशी नातं असणारा एक असा चेहराही समोर आला, जो सर्वांच्या ओळखीचा तर होता, पण मंगेशकरांशी या व्यक्तीचं असणारं नातं मात्र फार कमी लोकांना ठाऊक होतं. 


ही व्यक्ती होती, अभिनेत्री श्रद्धा कपूर. श्रद्धा सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक. मुळात तिला मानसोपचारतज्ज्ञ व्हायचं होतं. पण, नशिबानं मात्र वेगळाच पाठ तिच्यासाठी लिहिला होता. 


शालेय कार्यक्रमात अभिनय करतेवेळी तिच्यावर सलमानची नजर पडली आणि त्यानं तिला अभिनयाची ऑफर दिली. पण, तेव्हा शिक्षण घ्यायचं असल्यामुळं सलमानची ऑफर तिनं नाकारली. 


पुढे उच्च शिक्षणासाठी तिनं बोस्टन विद्यापीठ गाठलं. पण, एका वर्षाच्या शिक्षणानंतर जेव्हा ती सुट्टीसाठी भारतात आली तेव्हा फेसबुक प्रोफाईल पाहत तिला आणखी एका चित्रपटाची ऑफर मिळाली. 


यावेळी श्रद्धा नकार देऊ शकली नाही. 'तीन पत्ती' या चित्रपटासाठी तिनं होकार दिला. 


बोस्टनमध्ये असताना जेव्हा पैशांची गरज होती तेव्हा आपण एका कॉफी शॉपमध्ये काम केल्याचा उलगडा श्रद्धानं एका मुलाखतीत केला होता. 


अतिशय कमी वेळात श्रद्धानं बॉलिवूडमध्ये पाय घट्ट रोवले आणि तिनं आपली वेगळी ओळख निर्माण केली. 



अशी ही गोड आवाजाची श्रद्धा, भारतरत्न लता मंगेशकर यांची नात. दीदींच्या निधनानंतर हिलाही मोठा धक्का बसला होता. अतिशय भावनिक पोस्ट लिहित तिनं आपल्या या लाडक्या आजीला निरोप दिला होता.