बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) 2023 मध्ये मुंबईतील वांद्रे पश्चिम (Bandra West) भागात अपार्टमेंट विकत घेतलं होतं. मात्र हे घर आता तिने विकायला काढलं आहे. सोनाक्षी सिन्हाने अचानक आपलं घर विकायला काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे, याच अपार्टमेंटमध्ये ती झहीर इक्बालसह विवाहबंधनात अडकली होती. ही एक भावनिक बाब असतानाही सोनाक्षीने घर विकायला काढल्याने नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. 


घर विकायला काढलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिअल इस्टेट कंपनीने इंस्टाग्रामला सोनाक्षीच्या घराचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर हे उघडकीस आलं. या व्हिडीओत एजंटने संपूर्ण घऱ दाखवलं असून पोस्टमध्ये झहीर इक्बाललाही टॅग केलं आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये, अपार्टमेंटचे वर्णन प्रतिष्ठित 81 ऑरिएट बिल्डिंग, वांद्रे रेक्लेमेशन मधील आलिशान सी-फेसिंग व्ह्यू असं केलं आहे. 



पोस्टमध्ये या अपार्टमेंटची माहिती देण्यात आली आहे. त्यात लिहिण्यात आलं आहे की, 4200 चौरस फूट सी-फेसिंग अपार्टमेंट मूळत: 4 BHK होते. ते डेकसह प्रशस्त 2 BHK मध्ये रूपांतरित करण्यात आहे, हे अपार्टमेंट पूर्णपणे सुसज्ज आहे आणि अनेक आधुनिक सुविधांसह उपलब्ध आहे. या अपार्टमेंटची किंमत 25 कोटी रुपये आहे. सोनाक्षीने या पोस्टला लाईक केलं आहे. 


नेटझिन्सकडून प्रतिक्रिया


सोशल मीडियावर विकण्यासाठी काढण्यात आलेलं हे घर सोनाक्षीचं आहे समजताच कमेंट्सचा पाऊस पडू लागला. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त करताना आपलं मत मांडलं. 'हे सोनाक्षी सिन्हाचं घर आहे. इतक्या लवकर ती बाहेर पडतीये,' असं एक युजर म्हणाला आहे. तर एकाने लिहिलं आहे की, "सोनाक्षी आपलं घर का विकत आहे? नुकतंच तर तिने हे घर विकत घेतलं होतं".


'हे तर सोनाक्षी सिन्हाचं घऱ आहे ना? युट्यूबवर पाहिलं होतं,' असं एकाने लिहिलं आहे. एका युजरने सोनाक्षी गेल्या अनेक काळापासून हे घर विकण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला आहे. अनेकांना सोनाक्षी सिन्हा घर का विकत आहे? अशीच विचारणा केली आहे. 


माहितीनुसार, सप्टेंबर 2023 मध्ये सोनाक्षीने वांद्रे रेक्लेमेशन, वांद्रे पश्चिम येथील 81 ऑरिएटच्या 26 व्या मजल्यावर अपार्टमेंट विकत घेतला. सोनाक्षीची आई पूनम सिन्हा यांनी घराच्या करारावर सही केली आहे. करारात दिलेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटचे चटईक्षेत्र 4,210.87 चौरस फूट आहे आणि त्याची किंमत 11 कोटी रुपये आहे. सी-फेसिंग व्ह्यू असणाऱ्या या घऱातून माहीम खाडी आणि वांद्रे-वरळी सी-लिंक दिसतो.