Sonam Kapoor Pregnancy: अतिशय सुरेख पद्धतीनं आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिल्यानंतर अभिनेत्री सोनम कपूर हिनं वेळोवेळी गरोदरपणातील फॅशन गोल्सही दिले. दरम्यानच्या काळात ती पतीसोबत काही खास क्षण व्यतीत करताना दिसली. कुटुंबासोबत मजा मस्त करत सोनमनं या दिवसांत आनंद लुटला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या गरोदरपणाच्या प्रवासात चाहत्यांनाही सहभागी करुन घेणाऱ्या याच सोनमनं नुकताच एक फोटो शेअर केला तो पाहून मात्र अनेकांनाच भीती वाटली. आई होणं एक सुरेख अनुभूती, वेगळाच आनंद वगैरे सर्व्काही ठीक. पण, प्रत्यक्षात एका महिलेला गरोदरपणाच्या काळात नेमकं कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं यावरून सोनमनं पडदा उचलला. 


इनस्टा स्टोरीमध्ये तिनं एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये सोनम पलंगावर पाय मोकळे सोडून बसल्याचं कळत आहेत. फोटोमध्ये तिचा चेहरा नव्हे, तर फक्त पायच दिसत आहेत. सोनमच्या पायांना सूज आल्याचं या फोटोतून लक्षात येत आहे. 


कधीकधी गरोदरपणात सर्वकाही गोड नसतं... असं एक सूचक कॅप्शन तिनं या फोटोसाठी लिहिलं. बॉलिवूडच्या फॅशनिस्टानं पोस्ट केलेला हा फोटो पाहता, वास्तव जरा जास्तच वेदना देणारं असतं हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं. 



दरम्यान, तिचा हा फोटो चाहत्यांना चिंतेत टाकून गेला. तू बरी होशील, इथपासून अनेकांनीच यावेळी तिला धीर देईपर्यंतचंही काम केलं. चाहत्यांशी असणारं कलाकारांचं हे नातं हेवा वाटण्याजोगंच आहे.... नाही.