मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीच्या पहिल्या महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी आज आपल्यात नाही आहेत. पण त्यांनी आपल्या चित्रपटांतून नेहमीच लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित एक किस्सा शेअर करणार आहोत. 1989 मध्ये 'जोशीले' हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये सनी देओल आणि श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात सनी आणि श्रीदेवी यांच्या किस सीनचं शूटिंग होणार होतं. जेव्हा दिग्दर्शक शेखर कपूर यांनी श्रीदेवी यांना याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी हा सीन करण्यास नकार दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी यांनी नकार दिल्यानंतर शेखर कपूर यांनीही कुठलाच प्रश्न नं विचारता हा सीन स्क्रिप्टमधून हटवला, पण या नंतर श्रीदेवी खूप सावध झाल्या आणि कुठलाही चित्रपट साईन करण्यापूर्वी त्यांनी अट ठेवली की, त्या किसींग सीन करणार नाही. त्याचवेळी एक काळ असा आला की, मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांची जोडी बॉलिवूडमध्ये हिट ठरली. दिग्दर्शक उमेश मेहरा यांनी या दोघांसोबत चित्रपटाची सुरुवात केली, ज्या सिनेमाचं नाव होतं 'गुरु'


मात्र, हा चित्रपट साईन करताना श्रीदेवी यांनी स्पष्ट केलं होतं की, त्या किसिंग सीन करणार नाही. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाचं जवळपास ९० टक्के शूटिंग झालं तेव्हा त्यांना कळालं की स्क्रिप्टमध्ये एक किसिंग सीन आहे.


दिग्दर्शकाने श्रीदेवी यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकत नव्हत्या. श्रीदेवी म्हणाल्या, 'मी कोणताही किसिंग सीन करणार नाही, बस चित्रपट पूर्ण करा.' दिग्दर्शकाने पण श्रीदेवी यांच्या हट्टापुढे गुडघे टेकले.


वृत्तानुसार हा चित्रपट प्रदर्शित होताच खळबळ उडाली होती. या सिनेमात श्रीदेवी आणि मिथुन यांचा किसिंग सीन रिलीज झाल्यामुळे श्रीदेवी यांचे घरचेही त्यांच्यावर नाराज झाले. हा तो काळ होता जेव्हा श्रीदेवी पहिल्या महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जायच्या .


या सीनमुळे श्रीदेवी यांचे चाहतेही खूप निराश झाले होते, त्यानंतर श्रीदेवी यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली, ज्यामध्ये त्या म्हणाल्या, 'हा सीन मी शूट केला नाही तर, बॉडी डबलने हा सीन शूट केला गेला, मला फसवलं गेलंय.'


मीडिया रिपोर्टनुसार श्रीदेवींच्या पत्रकार परिषदानंतर 'गुरु' चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश मेहरा म्हणाले, 'हा सीन खरा आहे. श्रीदेवी यांनी या चित्रपटासाठी हा किसिंग सीन शूट केला होता