Entertainment : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्या जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor) या दोन मुलींबाबत सर्वांनाच माहित आहे. यापैकी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारलीय. पण आता श्रीदेवीची तिसरी मुलगी लवरकच बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात येणार आहे. पाकिस्तानच्या अनेक कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. फवाद खान आणि माहिरा खान यांनी हिंदी चित्रपटात भूमिका साकारली आहे. आता या यादीत आणखी एका पाकिस्तानी अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे ती अभिनेत्री?
या अभिनेत्रीने 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या सु्परहिट चित्रपटात अभिनेत्री श्रीदेवीच्या मुलीची भूमिका साकारली होती. पाकिस्तानमध्ये या अभिनेत्रीने अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलंय. या अभिनेत्रीचं नाव आहे सजल अली. (Sajal Ali) 2017 मध्ये आलेल्या मॉम या चित्रपटात सजल अलीने श्रीदेवीच्या मुलीची भूमिका केली होती. या चित्रपटात सजल अलीचं नाव आर्या सबरवाल असं होतं. सजलने सिंफ-ए-अहान, इश्क-ए-ला, ये दिल मेरा, यकीन का सफर या पाकिस्तान चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली आहे. 


श्रीदेवी यांची तिसरी मुलगी
वास्तविक एका मुलाखतीत श्रीदेवी यांनी सजल अली ही आपली तिसरी मुलगी असल्याचं सांगितलं होतं. 2018 मध्ये श्रीदेवी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने कुटुंब, मित्र परिवार आणि बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता, श्रीदेवी यांच्या निधनाच्या वृत्ताने सलज अली देखील दु:खी झाली होती. 2017 मध्ये सजल अलीच्या आईचं कॅन्सरने निधन झालं. यातून सावरत असतानाच श्रीदेवी यांच्या निधनाने सजजला मोठा धक्का बसला. आपण आपल्या दुसऱ्या आईलाला मुकलो अशी प्रतिक्रिया सजलने दिली होती. 


पाकिस्तानमध्ये लोकप्रिय अभिनेत्री
पाकिस्तानी अभिनेत्री सजल अलीने  'जिंदगी कितनी हसीन है' आणि 'खेल खेल में' या चित्रपटातही काम केलंय. 2023 मध्ये सजलने हॉलिवूड चित्रपट 'व्हॉट्स लव गॉट टू डू विद इट?' या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटात सजल अलीसह लिली जेम्स, शाजाद लतीप, शबाना आझमी, एम्मा थॉम्पसन आणि असीम चौधी यांनी भूमिका साकरल्या होत्या. 


सजल अली लवकरच दक्षिणेचा सुपरस्टार प्रभासबरोबर 'फौजी' या चित्रपटात दिसणार आहे. यासाठी ती भारतात येणार आहे. सध्या सजल अली पाकिस्तान चित्रपट 'जर्द पत्तों का बन' मुळे चांगलीच चर्चेत आहे.