मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारांनी पुढे येत त्यांच्या परिने इतरही मतदारांना या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलं. २०१४ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी झालेल्या मतदानाचे आकडे तुलनेने वाढल्याचं निरिक्षण काही मतदार संघांमध्ये केलं गेलं. या साऱ्यामध्ये चर्चेत आली ती म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्कर. विविध विषयांवर आपली मतं परखडपणे मांडणाऱ्या स्वराला पुन्हा एकदा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटामुळे धारेवर धरण्यात आलं आहे. या चित्रपटातील हस्तमैथुनाच्या तिच्या दृश्यामुळे स्वरा पुन्हा ट्रोल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे अमिताभ बच्चन, आमिर खान, सोनाली बेंद्रे, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग अशा कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावत इतरही मतदारांना आपला हक्क बजावण्याचं आवाहन केलं. तिथेच दुसरीकडे काही सर्वसामान्य नागरिकही या भूमिकेत दिसले. पण, त्यांनी मतदारांना मतदान केंद्रांकडे जाण्यास प्रवृत्त करण्यासाठी वापरलेल्या तंत्राचीच सध्या जास्त चर्चा होत आहे. 


सोशल मीडियावर या दोघांचा फोटो खुद्द स्वरानेही पोस्ट केला आहे. "This election, don’t be like Swara Bhasker, use your finger wisely. Vote Wisely!”, असं लिहिलेले फलक पकडत त्यांनी एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य केल्या. ज्यामुळे 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटातीवल हस्तमैथुनाच्या दृश्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. 



आपल्याविषयीचे हे फलक पाहता स्वराने ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत स्वत:च्या शैलीत त्याचं उत्तर दिलं. 'तुम्ही फारच समर्पक आहात.... त्यांची कल्पनाशक्ती ही ठराविक सीमेपर्यंत असी तरीही हे प्रयत्न प्रशंसनीय आहेत', असं ट्विट स्वराने केलं. स्वराचा हा अंदाज अर्थातच अनेकांसाठी फारसा नवा नाही. पण, मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी लढवण्यात आलेल्या बहुविध कल्पनांमध्ये हे ट्रोलिंग प्रकरण चांगलंच गाजतंय असं म्हणायला हरकत नाही.