मुंबई : हिंदी कलाविश्वात आपल्या ठाम वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्य़ा घरी नव्या पाहुणीचा प्रवेश झाला आहे. खुद्द स्वरानंच सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. इथं स्वराचं एक अनोखं रुप सर्वांनाच पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क भोजपूरी गीत गाताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोहर गीत गाणाऱ्या स्वराला नेटकऱ्यांनी पसंती दिली असून, तिच्या या व्हिडीओला सर्वांनीच लाईकही केलं आहे. काहींनी ही मुलगी कोण असा प्रश्नही विचारला आहे. ज्याचं उत्तर स्वरानं तिच्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)


आपण आपल्या भाचीचा जन्म आणि त्यामुळं कुटुंबात आलेला आनंद साजरा करत आहोत, असं तिनं या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सोहर गीत हे बाळाच्या जन्माच्या वेळी मोठ्या आनंद भावानं गायलं जातं. सहसा मुलाच्या जन्मानंतर हे गीत गाण्याची परंपरा आहे, पण स्वरानं मात्र हे गीत त्याच्या घरी आलेल्या लेकीसाठी गात तिचं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं आहे.