Tamannaah Bhatia Reaction On Wedding:  तमन्ना भाटिया सध्या तिच्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. 'स्त्री 2' चित्रपटातील तिच्या 'आज की रात' या गाण्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचे नाते नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघेही अनेकदा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत एकत्र दिसत आहेत. दोघांनीही त्यांच्या नात्याची पुष्टी दिली आहे. पण हे दोघे कधी लग्नबंधनात अडकणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अशातच आता त्यांच्या लग्नाबाबत संकेत मिळाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाबाबत तमन्ना भाटिया काय म्हणाली? 


तमन्ना भाटियाने एका मुलाखतीत तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला असता तिने एक मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, मी सध्या माझ्या आयुष्यात खूप खूश आहे. लग्नही होऊ शकते, का नाही. तमन्ना भाटिया म्हणाली, लग्नानंतर तिच्या करिअरवर कोणीही हस्तक्षेप करणार नाही. माझ्या लग्नाचा आणि करिअरचा काहीही संबंध नाहीये. लग्नानंतर देखील मी माझा अभिनय सुरुच ठेवणार आहे. त्यानंतर तमन्नाला पुन्हा विजय वर्मासोबत काम करण्यास आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अभिनेत्री म्हणाली की, जर चांगला प्रोजेक्ट मिळाला तर आम्ही दोघेही चांगले काम करू. विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करायला लागले. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मनीष मल्होत्राच्या घरी दिसले तमन्ना आणि विजय वर्मा


लग्नाबाबतच्या चर्चांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घराबाहेर दिसले. याचाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मनीष मल्होत्रा यांच्या घराबाहेर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा दिसल्यानंतर त्यांच्या विषय चाहत्यांनी अंदाज लावणे सुरु केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, तमन्ना आणि विजय यांनी लग्नाची तयारी सुरु केली आहे. चाहते देखील दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे.