मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या चित्रपट किंवा कोणा एका कलाकृतीपेक्षा जास्त चर्चेत असते ती म्हणजे तिच्या बोल्ड स्टेटमेंट आणि सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेल्या फोटो आणि व्हिडीओंमुळे. बॉलिवूड पार्टी किंवा एखादा पुरस्कार सोहळा असो, तिथं उर्वशी आली म्हणजे चर्चा तर होणारच. (Bollywood Actress urvashi rautela on her personal life indirectly took rishabh pants name watch video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या तिची चर्चा होतेय ती म्हणजे एका मुलाखतीच्या विहिडीओमुळे. या मुलाखतीत उर्वशी तिच्या खासगी आयुष्याविषयी बरीच चर्चा करताना दिसत आहे. एका वळणावर ती अशा व्यक्तीविषयी बोलताना दिसते ज्याच्या दोन पत्नी असतानाही तिच्यासोबत नाव जोडलं गेलं होतं. 


(urvashi rautela) उर्वशीच्या आयुष्याबाबतच हा खुलासा होत असतानाच एकाएकी क्रिकेटर ऋषभ पंत (rishabh pants ) याचंही नाव समोर आलं. कारण, अर्थात तिच मुलाखत. इथं तिनं अमुक एका व्यक्तीचा उल्लेख 'मिस्टर आरपी' असा केला. बरं, तो व्यक्ती कोण असं विचारलं असता ती त्याचं नावही सांगेना. 



उर्वशी तिच्या आयुष्यातील या मिस्ट्री मॅनबद्दल बोलताना थकेना. पुढे मुंबई भेटीला संदर्भ देत आपण डिनरसाठी गेलं असता माध्यमांच्या प्रतिनिधींनी आम्हाला पाहिलं, फोटो काढले आणि माध्यमांनीच एखादी गोष्ट जी घडू पाहतेय तिच उध्वस्त केली असं म्हटलं. 


उर्वशीच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आणि तिला सांगायचंय तरी काय याचाच इशं थांगपत्ता लागेना. प्रसिद्धीसाठी तिनं केलेली ही करामत पाहून नेटकऱ्यांनी तिली जोरदार खिल्ली उडवली.