मुंबई: कलाविश्वात प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या बायोपिकच्या ट्रेंडमध्ये आणखी एका चित्रपटाचा समावेश झाला आहे. मुख्य म्हणजे या बायोपिकची चर्चा ही त्याच्या घोषणेपासूनच सुरु झाली होती. त्यानंतर मग या बायोपिकच्या स्टारकास्टनेही सर्वांलं लक्ष वेधलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाविश्वात सध्याच्या घडीला बहुप्रतिक्षित ठरणारा हा चित्रपट म्हणजे एनटीआर यांचा बायोपिक. 


'कथानायकुडू' Kathanayakudu असं नाव असणाऱ्या या चित्रपटातील अभिनेत्री विद्या बालन हिचा लूक नुकताच सर्वांसमोर आला आहे. 


खुद्द विद्यानेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून हा लूक सर्वांच्या भेटीला आणला. 


तिने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ती आरशासमोर बसलेली दिसत असून, पांढऱ्या रंगाची साडी, केसात माळलेला गजरा आणि एकंदर चेहऱ्यावरील भाव पाहता या लूकमध्ये ती सर्वांचं लक्ष वेधत आहे. 


विद्या या चित्रपटामध्ये एनटीआर यांची पहिली पत्नी, बसवातारकम यांचं पात्र साकारणार आहे. 


सध्या या चित्रपटाचं हैदराबाद येथे चित्रीकरण सुरु असून, चित्रीकरणादरम्यानचाच एक फोटो तिने पोस्ट केल्याचं पाहायला मिळत आहे. 



काही दिवसांपूर्वीच या चित्रपटात श्रीदेवी यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रकुलप्रीत हिच्या लूकवरुन पडदा उचलण्यात आला होता. 


कलाकारांची तगडी फौज, चित्रपटातं तितकच दमदार कथानक आणि त्याची पार्श्वभूमी पाहता येत्या काळात आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती यशवी ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.