गडगंज श्रीमंती असूनही यामी गौतमच्या हाती निराशा; उपायच नाही अशा आजारानं ग्रासलं...
सध्याच्या घडीला यामी ज्या वळणावर आहे, ते वळण पाहता तिथं तिला कशाचीही कमी नाही. पण, ते म्हणतात ना दिसतं तसं नसतं...
Yami Gautam Disease: मालिका विश्वातून रुपेरी पडद्यावर झळकणारी आणि आपल्या अभिनयाच्या बळावर मोठी झालेली अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरते. निवडक चित्रपट करत असली तरीही त्यामध्ये ती जीव ओतून काम करते आणि चाहत्यांचा तिच्या या भूमिकांना उत्तम प्रतिसादही मिळतो. सध्याच्या घडीला यामी ज्या वळणावर आहे, ते वळण पाहता तिथं तिला कशाचीही कमी नाही. पण, ते म्हणतात ना दिसतं तसं नसतं... (Bollywood Actress Yami Gautam Suffering from keratosis pilaris skin disease know the symptoms)
(Yami Gautam) यामीसोबतही असंच घडलं आहे. गडगंज पैसा असूनही यामी एका उपाय नसणाऱ्या आजाराशी झुंज देत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनंच याबाबतची माहिती दिली होती. काही फोटो जोडत तिनं आपली कहाणी चाहत्यांसमोर मांडली होती.
अधिक वाचा : जेव्हा 'ते' भारतीला चुकीच्या पद्धतीने करायचे स्पर्श; खुद्द कॉमेडियनकडून मोठा खुलासा
यामीला कोणता आजार? (Yami Gautam Disease)
एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये यामीनं लिहिलेलं, ‘हल्लीच माझं एक फोटोशूट झालं आणि फोटो पोस्ट प्रोडक्शनसाठी जाणार होते जिथं केराटोसिस-पिलारिस लपवलं जाणार होतं. त्याचवेळी मी ठरवलं की मला असणाऱ्या या आजाराचा स्वीकार का करत नाही? असा प्रश्न मीच स्वत:ला केला.
'मी तारुण्यावस्थेपासून या आजाराशी दोन हात करतेय', असं तिनं या पोस्टमध्ये म्हटलं. या आजारामध्ये चेहऱ्यावर लहान पुरळं येतात. त्यांच्याकडे पाहिलंही जाऊ नये इतकेही ते वाईट नसतात, असं म्हणत तेव्हापासून आतापर्यंत त्याचा कोणताही उपाय नाही असं सांगत अखेर आपण या आजाराला स्वीकार करत मनातली भीती दूर करण्याचा निर्णय घेतला, असं यामीनं स्पष्ट केलं.
पिलारिसची लक्षणं... (keratosis pilaris Symptoms)
- हाताच्या कोपरावर, मांड्या, गालांवर वेदना नसणारी लहान पुरळ
- रुक्ष त्वचा आणि पुरळं
- हवामान बदलामुळं रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं, त्वचा अपेक्षेहून जास्त रुक्ष होणं
- त्वचेवर पुरळांमुळे उंचवटे निर्माण होणं