Bollywood Celebs private Life: जीवनामध्ये यश, अपयश, आनंद, दु:ख अशा अनेक मुद्द्यांवर खुलेपणानं बोललं जातं. यावर ओघाओघानं प्रतिक्रियाही दिल्या जातात. पण, काही गोष्टींवर व्यक्तही होण्यास अद्याप तितकीशी सकारात्मकता दिसून आलेली नाही. यामध्ये दोन व्यक्तींमधील खासगी अर्थात प्रायव्हेट क्षण, मासिक पाळी अशा विषयांचा समावेश आहे. मासिक पाळीबाबत किमान आता समाजजागृतीनं परिस्थिती सुधारली आहे. पण, दोन व्यक्तींमध्ये असणारं शारीरिक नातं मात्र अद्यापही न्यूनगंडाच्याच नजरेतून अनेकदा पाहिलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीमध्ये शारीरिक संबंधांबावर बरेच कार्यक्रम, काही चित्रपट आणि कलाकार मंडळींनी केलेली वक्तव्य हे चित्र बदलण्याचं काम करत असतात. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार आलिया, रणबीर, इम्रान हाश्मी यांनी त्यांच्या प्रायवेट लाईफबाबत असेच काही खुलासे केले आहेत. 


आलिया भट्ट- एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट हिनं आपल्या आवडीच्या पोझिशनबाबत सांगितल्याचं म्हटलं जातं. मी अगदी साधीभोळी मुलगी असल्यामुळे, मिशनरी पोझिशनच आवडते, असं तिनं सांगितलं होतं. 


अर्जुन कपूर- एखाद्या व्यक्तीसाठी प्रेमाहून जास्त, जीवनात शारीरिक संबंधही तितकेच महत्त्वाचे असतात असं अर्जुन कपूरचं मत आहे. 


दीपिका पदुकोण- दीपिका पदुकोणच्या मते शारीरिक संबंध किंवा अशा प्रायव्हेट क्षणांमध्ये भावनाही अतिशय महत्त्वाच्या असतात. 


इम्रान हाश्मी- चित्रपटांमध्ये चुंबनदृश्यामुळं चर्चेत आलेल्या इम्रान हाश्मीनं आपण, कॉलेजच्या दिवसांमध्ये वन नाईट स्टँडबाबत विसरलोच नसल्याचं एका मुलाखतीत म्हटलं होतं. 


करण जोहर- सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबाबतची माहिती काढून घेणाऱ्या करण जोहरनंच एकदा खुलासा केला होता, की त्यानं वयाच्या 26 व्या वर्षीच वर्जिनीटीची रेष ओलांडली होती. 


रणबीर कपूर - एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीनुसार रणबीरनं वयाच्या 15 व्या वर्षी पहिल्यांदाच व्हर्जिनीटी गमावली होती. 


रणवीर सिंग- वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी रणवीरनं व्हर्जिनीटीची रेष ओलांडली होती असं सांगितलं जातं. तो आपल्याही मुलांना बिघडवतोय असंच त्याच्या शाळेतील मुलांच्या पालकांना वाटत होतं. 


ट्विंकल खन्ना- जीवनातील प्रत्येक टप्प्यावर दोन व्यक्तींमध्ये असणारं हे शारीरिक नातं, जवळीक महत्त्वाची असते. अक्षय हा प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये बदल करत होता, त्यामुळंच त्याच्याकडे आपण आकर्षित झाल्याचं ट्विंकलनं म्हटलं होतं, असंही कळत आहे.